शिरपूरची कोरोना मुक्तीकडे वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:51 AM2021-06-09T04:51:20+5:302021-06-09T04:51:20+5:30

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत देशभरात प्रचंड प्रमाणात रुग्ण संख्या वाढून जीवित हानीही मोठ्या प्रमाणात झाली. यातून ग्रामीण भागही ...

Shirpur's corona on the way to liberation! | शिरपूरची कोरोना मुक्तीकडे वाटचाल!

शिरपूरची कोरोना मुक्तीकडे वाटचाल!

Next

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत देशभरात प्रचंड प्रमाणात रुग्ण संख्या वाढून जीवित हानीही मोठ्या प्रमाणात झाली. यातून ग्रामीण भागही सुटला नाही. जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरपुरातही एप्रिल, मे महिन्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. गावातील कमी वयाचे पाच ते सहाजण कोरोनामुळे एप्रिल - मे महिन्यात मृत्युमुखी पडले. मोठ्या प्रमाणात खर्च करूनही काही जीव वाचवता आले नाहीत. या काळात आरोग्य विभागाकडून गावात रुग्ण संख्या वाढू नये म्हणून कोरोना टेस्ट व लसीकरणावर भर देण्यात येत होता. मेच्या शेवटी व जूनचा पहिल्या आठवड्यात कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. ४ जूनपर्यंत प्राप्त अहवालापैकी एक दोन कोविड सेंटरमधील ॲक्टिव्ह रुग्ण वगळता गावात एकही रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. ५, ६ व ७ जूनचा केलेल्या कोरोना तपासणीचे अहवाल येणे बाकी आहे. एकंदरीत शिरपूर गावची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपले नसून जिल्हाधिकारी यांनी निर्देशित केलेल्या नियमांचे पालन सर्व नागरिकांनी करावे, असे आवाहन ग्राम विकास अधिकारी भागवत भुरकाडे यांनी केले आहे.

Web Title: Shirpur's corona on the way to liberation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.