नारायण राणे यांच्या व्यक्तव्याप्रकरणी शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:46 AM2021-08-25T04:46:13+5:302021-08-25T04:46:13+5:30

वाशिम : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पाली येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ...

Shiv Sena is aggressive over Narayan Rane's statement | नारायण राणे यांच्या व्यक्तव्याप्रकरणी शिवसेना आक्रमक

नारायण राणे यांच्या व्यक्तव्याप्रकरणी शिवसेना आक्रमक

Next

वाशिम : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पाली येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व अपमानजनक विधान केल्याचे पडसाद जिल्ह्यात मंगळवारी उमटले. या घटनेचा निषेध म्हणून खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात वाशिम शहरातील पाटणी चौक येथे निषेध मोर्चा काढून नारायण राणे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जिल्ह्यातही निषेध आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक संयमशील व्यक्तिमत्व असून त्यांनी महाराष्ट्राला अनेक अडचणीतून सावरण्याचे काम केले आहे, असे सांगत राजकीय द्वेषापोटी ना. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल २३ ऑगस्ट रोजी पाली येथील जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आक्षेपार्ह व अपमानजनक विधान केल्याने शिवसेनेसह जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या. याप्रकरणी ना. राणे यांचेवर तातडीने फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही शिवसैनिकांनी केली. यावेळी वाशिम शिवसेना तालुका प्रमुख रामदास मते पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गे, उपजिल्हाप्रमुख महादेव सावके, शिवसेना शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, युवा सेना शहरप्रमुख गजानन ठेंगडे, शिवसैनिक राजाभय्या पवार, बालाजी वानखेडे, बाळासाहेब देशमुख, उमेश मोहळे, विजय खानझोडे, नगरसेवक कैलास गोरे, अतुल वाटाणे, नितीन मडके यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena is aggressive over Narayan Rane's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.