शिवसेना शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे - रावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:22 AM2017-09-08T01:22:30+5:302017-09-08T01:22:34+5:30
मागील पावणे दोन महिन्यापासून राज्यात पाऊस नसल्याने पावसाअभावी खरीप हंगामातील सोयाबीन, मुग, उडीद, ज्वारी इत्यादी पिके शेतकर्यांच्या हातातील गेलेले आहे. तर कापसाचे उत्पादन निम्म्यावर येवुन ठे पले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे,मु ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन शे तकर्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहे असे सांगत शिवसेना शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे विदर्भ संपर्क नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: मागील पावणे दोन महिन्यापासून राज्यात पाऊस नसल्याने पावसाअभावी खरीप हंगामातील सोयाबीन, मुग, उडीद, ज्वारी इत्यादी पिके शेतकर्यांच्या हातातील गेलेले आहे. तर कापसाचे उत्पादन निम्म्यावर येवुन ठे पले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे,मु ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन शे तकर्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहे असे सांगत शिवसेना शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे विदर्भ संपर्क नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी केले.
स्थानिक परशुराम भवन येथे गुरुवार ७ सप्टेंबर रोजी जिल्हा शिवसेनेच्यावतीने आजीमाजी पदाधिकारी व शिवसैनिकांसाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नामदार रावते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार श्रीकांत देशपांडे, माजी आमदार विजयराज शिंदे, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा प्रमुख राजेश पाटील, माजी जिल्हा प्रमुख डॉ.सुधीर कव्हर, पंजाबराव झनक, उपजिल्हा प्रमुख माणिक देशमुख, जि.प.सभापती विश्वनाथ सान प, डॉ.सुभाष राठोड, नगरसेवक अँड.विशाल खंडेलवाल, राजु भांदुर्गे, अतुल वाटाणे, निलेश पेंढारकर, तालुका प्रमुख गजानन भांदुर्गे, तालुका प्रमुख विवेक नाकाडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी ना.रावते पुढे म्हणाले की, हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण घेवुन हातात शिवबंधन घातलेल्या शिवसैनिकांनी ग्रामीण पातळीवर घराघरात शिवसेना पोहोचविण्यासाठी झटले पाहिजे. या प्रसंगी रावते यांनी आगामी सोमवार ११ सप्टेंबर रोजी सं पूर्ण राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसैनिक राज्यव्यापी भव्य मोर्चा काढुन नवरात्रीमध्ये शेतकर्यांना कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी शासनाकडे करीत असल्याचे माहिती दिली.
याप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात वाशिम जिल्ह्यात शिवसेनेमध्ये गट तट अथवा मतभेद नसल्याचे स्पष्ट करीत शिवसैनिकांनी संघटीतपणे कार्य करण्याचे आवाहन केले. तर खासदार भावना गवळी यांनी कमी बोलणे व जास्त काम करणे यावर आपला भर असुन दोन्ही जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या पाठीशी उभी असल्याचे सांगितले. शिवसेना वाढीसाठी आपण पोटतिडकीने काम करणार असल्याचे सांगत जाहीरातीमध्ये आपला फोटो न टाकणार्या तसेच मुद्दामुन लहान किंवा मोठे फोटो टाकणार्यांना खडेबोल सुनावले. यामुळे आपल्यावर कुठलाही परिणाम होणार नसुन आपण एकनिष्ठतेने काम करीत राहु असे म्हटले.
शिवसैनिक मार्गदर्शन मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रमुख राजेश पाटील , शिव आरोग्य सेना प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. श्याम जाधव यांच्यासह हरिष सारडा, सुरेश कदम, रमेश घुगे, दिनेश राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.सुभाष राठोड, नागोराव ठेंगडे, दिलीप काष्टे , रवि पाटील, नितीन मडके, उमेश मोहळे, गणेश गाभणे, राजाभैय्या पवार, गणेश ठाकरे, आदिंनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रमुख राजेश पाटील तर संचालन व आभार प्रदर्शन हरिष सारडा यानी केले.
याप्रसंगी कैलास गोरे, सुरेश मापारी, किरण धामणे, बंडु शिंदे, विशाल खंडेलवाल, संजय जोशी, सुरज इंगळे आदिसह शिवसेनेचे जिल्ह्यातील आजीमाजी पदाधिकारी जि.प. व पं.स.पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठय़ा सं ख्येने उपस्थित होते.