मानोरा - कारंजा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याकरिता शिवसेना छेडणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 03:07 PM2017-12-25T15:07:32+5:302017-12-25T15:12:26+5:30

कारंजा: मानोरा- कारंजा तालुका गंभीर दुष्काळ घोषीत करण्याची मागणी शिवसेनेचे वाशिम जिल्हाप्रमुख यांच्या सुचनेवरून डॉ. सुभाष राठोड यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कारंजा यांना निवेदन दिले.

Shiv Sena's movement to declare drought-hit Karanja taluka |  मानोरा - कारंजा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याकरिता शिवसेना छेडणार आंदोलन

 मानोरा - कारंजा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याकरिता शिवसेना छेडणार आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देयावर्षी मानोरा- कारंजा तालुक्यात खरीपातील पिकांनी शेतकऱ्यांना नाऊमेद केले आहे.डॉ. सुभाष राठोड यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कारंजा यांना निवेदन दिले.

कारंजा: मानोरा- कारंजा तालुका गंभीर दुष्काळ घोषीत करण्याची मागणी शिवसेनेचे वाशिम जिल्हाप्रमुख यांच्या सुचनेवरून डॉ. सुभाष राठोड यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कारंजा यांना निवेदन दिले. यावर्षी मानोरा- कारंजा तालुक्यात खरीपातील पिकांनी शेतकºयाना नाऊमेद केले आहे.पावसाया लहरीपणा आणि विषम वातावरणामूळे विविध कीड व अळीच्या प्रादुर्भावामूळे शेतकऱ्यांचे अपेक्षित अंदाज फोल ठरले आहे. सुरुवातीला मुग व उडीदाचे उत्पादन घटले त्यानंतर सोयाबीनचे सुद्धा उत्पादन कमालीचे घटले. त्यातच कपाशीवर असलेली भिस्त केवळ स्वप्न ठरली आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतकरी या वर्षी कापसावरील बोंडअळीच्या हल्ल्याने अक्षरश : कोलमडून गेला आहे, हवालदिन झाला आहे. संपूर्ण कारंजा -मानोरा तालुक्यातील काही गावामध्ये ५० त्न तर काही गावामध्ये ३० त्न पेक्षाही मुग, उडीद, सोयाबीन व कापूस पीकांची आणेवारी असल्याची वास्तवीक परिस्थीती आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी खायाचे काय आणि वर्षभर कुटुबांचे पालनपोषण कसे करायचे या चिंतेने शेतकऱ्यांना  ग्रासले आहे. शेतकरी अशा बिकट परिस्थीतीत सापडला असल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. याच गंभीर परिस्थीतीमूळे मागील महिन्यात मानोरा तालुक्यातील सोयजना येथील रामदास मिसाळ या शेतकऱ्या  चिट्ठी लिहून आत्महत्या केली. तसेच कारंजा येथील कुपटी येथील मंगेश ल व्हाळे या शेतकऱ्या ने सुद्धा याच परिस्थीतीला कंटाळून आत्महत्या  केली. वाशिम जिल्ह्यात सर्वात जास्त कारंजा तालुक्यात तर मानोरा दोन नंबर वर आहे.करिता या गंभीर परिस्थीतीचा गांभीयार्ने विचार करून आयुक्तालयात खरा अहवाल पाठवावा अन्यथा कार्यालयाला ताला ठोकणार असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्याला निवेदन देतेवेळी डॉ. सुभाष राठोड यांनी इशारा दिला. निवेदन देतेवेळी डॉ. सुभाष राठोड यांचे सोबत उपजिह्म् प्रमुख दिनेश राठोड, उपशहरप्रमुख कन्हैया ठाकुर, प. स. सदस्य रवि भूते,उप तालुका प्रमुख बबन हळदे, जगदिश थेर, विलास सुरळकर, विलास कडू, सर्कल प्रमुख संदिप राठोड, शाम भगत, संतोष बान्ते, राजेन्द्र वानखेडे, विभागप्रमुख घनश्याम जयराज, पवन गुल्हाने, सागर बारबोले, सागर राऊत, शाखाप्रमुख प्रमोद भोयर, गजानन टाके, निरंजन गोळे, जितेन्द्र बोबडे, केशव चौके, राजेश भोयर, शिवा कांबळे, सचिन हाते, राजु श्रीनाथ, ज्ञानेश्वर ठाकरे, इत्यादी शिवसैनिका सह शेतकरी आत्माराम पिंगाने, मधुकर खानझोडे, तुकाराम चव्हाण, राजाराम राजगुरे, कैलास चक्रे, गजानन शिंदे,शरद घाटे, सुभाष पवार, बाळु उजवणे, सुभाष पुंड उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena's movement to declare drought-hit Karanja taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.