कारंजा-मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 05:27 PM2018-12-11T17:27:08+5:302018-12-11T17:27:21+5:30

दुष्काळाचा खरा अहवाल शासनाकडे पाठविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलन करुन उपविभागीय कार्यालय कारंजावर ११ डिसेंबर रोजी धडक दिली.

Shiv Sena's movement to declare Karanja-Manora taluka drought | कारंजा-मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

कारंजा-मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा  :  या भागातील पिक परिस्थितीचा, शेतकरी आत्महत्येचा गांभीर्याने विचार करुन कारंजा-मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा, केंद्रीय पथकाला बोलावून या भागाची पाहणी करुन दुष्काळाचा खरा अहवाल शासनाकडे पाठविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलन करुन उपविभागीय कार्यालय कारंजावर ११ डिसेंबर रोजी धडक दिली. यावेळी शेकडो शेतकºयांच्या उपस्थितीत डॉ. सुभाष राठोड यांच्या नेतृत्वात अधिकाºयांना निवेदन सादर करण्यात आले.
शिवसेनेच्यावनिते उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, यावर्षीच्या हंगामात परतीच्या पावसाने दडी माल्यामुळे खरिपातील मुग, उडीदासह सोयाबीन पिकांचे उत्पादनात कमालीची घसरण झाली. तर तूर या पिकाची सुध्दा अंत्यत बिकट अवस्था आहे. त्यामुळे दुष्काळाची भयानक अवस्था असल्यामुळ या भागातील शेतकरी व शेतमजुर कामाकरिता स्थलांतर करीत आहेत. गत हंगामातही तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती ओढावल्यामुळे सोयजना येथील शेतकरी रामदास मिसाळ , कारंजा तालुक्यातील कुपटी येथे मंगेश लव्हाळे यांनी आत्महत्या केली होती.  तसेच दोन्ही तालुक्यातील मागील खरिप हंगामातील आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी असतांना सुध्दा शासनाकडून या भागातील शेतकºयांना कोणतीच मदत मिळाली नाही. सन २०१८-१९ या वर्षात जिल्हयात सर्वात जास्त आत्महत्या या कारंजा तालुक्यात झालेल्या आहे. गेल्या चार ते पाच वर्षापासून सततच्या नापिकीमुळे या भागातील शेतकरी अडचणीत आले आहेत. तरी दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे व येथील शेतकºयांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. असे न झाल्यास दोन्ही तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष राठोड, नरहरी कडू, कन्हैया ठाकुर, गजानन बनारसे, उकंडा राठोड, श्रीकृष्ण चौधरी, शालीकराम रसाळे, किशोर नेतनकर, बंडू घाटे, रामचंद्र लव्हाळे, विजय राऊत, पांडुरंग दहापुते, गजानन घाटे, गोपाल घाटे, दत्तात्रय राठोड यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Shiv Sena's movement to declare Karanja-Manora taluka drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.