चुकीच्या कामाबाबत शिवसेनेचा रास्ता राेकाे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:47+5:302021-06-24T04:27:47+5:30

चुकीच्या कामामुळे १९ जून रोजी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये शिरपूर पोलीस स्टेशनअंतर्गत कार्यरत असलेल्या जया खराटे यांचा अपघात होऊन त्यात ...

Shiv Sena's way of doing wrong | चुकीच्या कामाबाबत शिवसेनेचा रास्ता राेकाे

चुकीच्या कामाबाबत शिवसेनेचा रास्ता राेकाे

googlenewsNext

चुकीच्या कामामुळे १९ जून रोजी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये शिरपूर पोलीस स्टेशनअंतर्गत कार्यरत असलेल्या जया खराटे यांचा अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वीही अनेक घटना घडल्यात. मात्र, काेणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने शिवसेना अक्रमक हाेऊन २३ जून राेजी सकाळी नागरिकांसह रास्ता राेकाे केला. सदर आंदाेलन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, भागवतराव गवळी, महादेव सावके, दत्ता पाटील तुरक, रवी भांदुर्गे, रामदास मते पाटील आदींच्या नेतृत्वात करण्यात येत आहे.

अकोला ते नांदेड, वारंगा फाटा या महामार्गावरील जांभरून परांडे फाट्यानजीक पुलाच्या वरच्या स्लॅबची उंची ही दोन्ही बाजूच्या रोडच्या कडेच्या २५० एम.एम.खाली असून, याठिकाणी रपटा पडल्यामुळे येथे दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघातग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या मंगला सरनाईक, महादेवराव ठाकरे, गजानन भांदुर्गे, गजानन ठेंगडे, अरुण मगर आदींसह शिवसैनिक व नागरिक सहभागी झाले हाेते. सदर आंदाेलनाबाबत निवेदनाद्वारे पालकमंत्री शंभुराज देसाई, खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार यांना कळविण्यात आले हाेते.

Web Title: Shiv Sena's way of doing wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.