शिवाजी महाराज हेच खरे समाजसुधारणेचे प्रणेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:47 AM2021-09-23T04:47:19+5:302021-09-23T04:47:19+5:30

ते स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने खामगाव येथील सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे महाविद्यालय आणि आंबेडकर राईट ...

Shivaji Maharaj is the founder of true social reform | शिवाजी महाराज हेच खरे समाजसुधारणेचे प्रणेते

शिवाजी महाराज हेच खरे समाजसुधारणेचे प्रणेते

Next

ते स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने खामगाव येथील सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे महाविद्यालय आणि आंबेडकर राईट हिस्ट्री काँग्रेसच्या आयोजित केलेल्या ऑनलाइन इतिहास राष्ट्रीय परिषदेमध्ये बोलत होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळी आणि वर्तमान या विषयावर आयोजित या परिषदेचे उद्घाटन प्राचार्य. डॉ. जे. बी. देव्हडे यांनी केले. प्राचार्या नीलिमा देशमुख यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. मुख्य रिसोर्स पर्सन असणाऱ्या उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद येथील डॉ. इंदिरा सूर्यवंशी यांनी स्त्री सुधारणा चळवळीचा विस्तृत आढावा घेतला. चिखली येथील डॉ. विष्णू पडवाल यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. प्रमोद चव्हाण तर आभारप्रदर्शन डॉ. श्रीहरी पितळे यांनी केले. या कार्यक्रमाला देशभरातून झूम मीटिंगद्वारे शंभर आणि यूट्यूबद्वारे शंभर सभासदांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला बाबाराव पाटील खडसे, सद्गुण देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Shivaji Maharaj is the founder of true social reform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.