समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत शिवार फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:18 AM2021-02-21T05:18:05+5:302021-02-21T05:18:05+5:30
-------------- बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी वाशिम: जिल्ह्यात वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची त्वरीत कोरोना चाचणी करण्याचे ...
--------------
बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी
वाशिम: जिल्ह्यात वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची त्वरीत कोरोना चाचणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिलेत. या अनुषंगाने शनिवारी जिल्हाभरात ३०० पेक्षा अधिक लोकांची आरोग्य विभागाने चाचणी केली.
----------------
पीक नुकसानाची पाहणी
वाशिम: जिल्ह्यात गुरुवारी अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संदर्भात शेतकºयांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी कृषी विभागाच्या पथकाने गावागावांत भेटी देऊन पाहणीस सुरुवात केली.
-----------------
अवैध लाकूड वाहतुकीची तपासणी
वाशिम: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वृक्षतोड करून अवैधरित्या लाकडांची वाहतूक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तपासणी मोहीम सुरू केली असून, शनिवारी मंगरुळपीर-वाशिम मार्गावर काही वाहनांची तपासणी करण्यात आली.
----------------
बाजारात पोलिसांची फेरी
वाशिम: जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकाºयांनी मास्क वापरणे बंधनकारक करून जमावबंदीचे आदेश दिले आहेत. याची पडताळणी करण्यासाठी शनिवारी पोलिसांनी बाजारात फेरी मारू न कारवाई केली.
-----------------