‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या गजराने दुमदुमली वाशिम नगरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 06:18 PM2019-02-19T18:18:54+5:302019-02-19T18:19:34+5:30

वाशिम : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८९ व्या जयंतीचा सोहळा १९ फेब्रूवारीला जिल्हाभरात हर्षोल्लासात साजरा झाला.

Shivjayanti celebrated in the city of Washim! | ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या गजराने दुमदुमली वाशिम नगरी!

‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या गजराने दुमदुमली वाशिम नगरी!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८९ व्या जयंतीचा सोहळा १९ फेब्रूवारीला जिल्हाभरात हर्षोल्लासात साजरा झाला. यानिमित्त निघालेल्या भव्य रॅलीत झालेल्या ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या गजराने वाशिम नगरी अक्षरश: दुमदुमून गेली.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून वाशिममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. त्यानुसार, यंदाही उत्सव समितीचे अध्यक्ष शिखरचंद बागरेचा यांच्यासह अन्य पदाधिकारी व सर्वधर्मीय समाजबांधवांच्या पुढाकारातून हो सोहळा हर्षोल्लासात साजरा झाला. सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महारांच्या पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.  त्यानंतर खासदार भावना गवळी, उपविभागीय पोलिस अधीकारी डॉ. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले यांनी झेंडी दाखवून रॅलीला सुरूवात झाली. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमक करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये रिठद येथील शिवशंभो ढोलताशा पथक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. ढोलताशा पथकाच्या मागे सजविलेल्या शिवरथावर जिजाऊ व शिवरायांच्या भूमिकेत चिमुकले आरूढ झाले होते. 

साबीर शेखने साकारली शिवाजी महाराजांची वेशभूषा
सार्वजनिक शिवजयंती उत्सवात शिवरथावर साबीर इसाक शेख या मुलाने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारली; तर राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत असलेल्या अंजली नरेंद्रसिंह ठाकूर हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. साबीर शेख याने समारोपीय कार्यक्रमस्थळी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त करून उपस्थितांची वाहवा मिळविली. 

पुलवामा घटनेतील शहीद जवानांना श्रद्धांजली!
शिवजयंतीच्या समारोपीय कार्यक्रमाची सुरूवात जिजाऊ वंदनेने झाली झाली. यावेळी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमस्थळी शहीद जवानांच्या स्मरणार्थ रेखाटण्यात आलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Web Title: Shivjayanti celebrated in the city of Washim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.