शेतकऱ्यांना पिकविम्यासाठी शिवसैनिक बँकेत धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:52 PM2018-07-17T13:52:11+5:302018-07-17T13:53:48+5:30
शासनाने जाहिर केलेली कर्जमाफी, बोंडअळी, सोयाबीन अनुदान अजूनपर्यन्त शेतकºयांच्या खात्यात जमा झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : शेतकऱ्यांना पिकविमा ताबडतोब मिळावा म्हणून कामरगाव येथील स्टेट बँकेत धडक देवून शाखा व्यवस्थापकाला दोन दिवसाच्या आत पिकविमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना दिली नाही तर शिवसेना अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेवून बँकेत राडा करतील, असा ईशारा शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य डॉ सुभाष राठोड व शिवसेनेचे तालुकाप्रमुख नरहरी कडू यांनी पत्राद्वारे दिला.
शासनाने जाहिर केलेली कर्जमाफी, बोंडअळी, सोयाबीन अनुदान अजूनपर्यन्त शेतकºयांच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे यावर्षीच्या खरीपाची पेरणी काही शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज काढून, तर काहीनी उसनवारी करुन कशीतरी केली. त्यातच वन्यप्राण्यांच्या पिक नासाडीमूळे शेतकरी हतबल झालेला आहे.त्यामुळे शेतकरी प्रचंड संतापलेला आहे. अशा परिस्थीतीत पिकविम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांकडून किंवा शिवसैनिकाकडून एखादा अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची जबाबदारी आपली असेल , असे या बँकेच्या शाखा व्यवस्थापकला पत्राद्वारे कळविले. या पत्राची एक प्रत कामरगाव पोलीस स्टेशनला सुध्दा देण्यात आली. यावेळी पत्र देताना डॉ सुभाष राठोड यांचे सोबत शिवसेनेचे कारंजा तालुकाप्रमुख नरहरी कडू पाटील, सर्कल प्रमुख शाम भगत, संदिप राठोड, रवी भुते,जगदिश थेर, ओहम डोळस,संजय राऊत, गजानन हळदे ,गजानन काळे,प्रशान्त घोडे ईत्यादी शिवसेनेच्या पदाधिकारीसह व शेतकरी उपस्थित होते.