शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिवसैनिक धडकले वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 06:31 PM2018-09-24T18:31:01+5:302018-09-24T18:31:37+5:30
वाशिम - शेतकºयांच्या विविध मागण्या निकाली काढण्यासंदर्भात शिवसेनेच्यावतीने २४ सप्टेंबर रोजी मोर्चा नेण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - शेतकºयांच्या विविध मागण्या निकाली काढण्यासंदर्भात शिवसेनेच्यावतीने २४ सप्टेंबर रोजी मोर्चा नेण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
जिल्हयात सन २०१८-१९ या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये शेतकºयांनी पेरलेल्या पिकांसाठी शेवटच्या दिवसात पाण्याची आवश्यकता होती. परंतु पावसाअभावी शेतातील सोयाबीन पिकांना परिपक्व अशा शेंगा भरल्या नाहीत. सोयाबीन पिक शेतकºयांंच्या हातातुन निसटुन गेले. यावर्षी अनेक शेतकºयांनी पिकविमा काढला असल्यामुळे सरकारी यंत्रणेने कार्यालयात बसून सर्वेक्षण न करता प्रत्यक्ष शेतात जावून शेतकºयांसमक्ष पिक कापणी सर्वेक्षण करावे. तसेच सन २०१७-१८ मधील काही पात्र शेतकºयांच्या पिक विम्याची रक्कम अद्यापही त्यांना देण्यात आली नाही. तालुक्यातील वाशिम, अनसिंग व वारला या मंडळातील शेतकºयांनी पिकविमा भरला. परंतु चुकीच्या सर्वेक्षणामुळे त्यांना पिकविम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे ज्या पात्र परंतु अद्याप पिकविमा न दिलेल्या शेतकºयांना पिक विमा अदा करण्याचे निर्देश संबंधीत विमा कंपन्यांना देण्यात यावेत. शासनाने २४ जून २०१७ रोजी कर्जमाफी जाहीर केली होती. पात्र शेतकºयांना पिक कर्ज देणे क्रमप्राप्त होते. परंतु अनेक बँकांनी पात्र शेतकºयांना पिक कर्जाचे वाटप न केल्यामुळे शेतकरी पिक कर्जापासून वंचित आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.