वाशीम बसस्थानकामध्ये आवतरली ‘शिवशाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 07:29 PM2017-11-06T19:29:56+5:302017-11-06T19:30:46+5:30
वाशीम : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने वातावरण कुलीत निमआराम ‘शिवशाही’ बस सुरू केल्या आहेत. यवतमाळ-पुणे मार्गे वाशीम जाणा-या ‘शिवशाही’ बस वाशिम येथे आली असता बसच्या चालक वाहक चा सत्कार शिवसेनेच्यावतीने करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क

यावेळी कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष गजाननराव वडजीकर देशमुख, कृषी उपन्न बाजार समितीचे उपसभापती सुरेश मापारी, अशोक शिराळ, विभागीय सरचिटणीस रमेश वानखेडे, डेपो अध्यक्ष देवा राजगुरू, सचिव शाम मुंदरे, उपाध्यक्ष पंचुभाई वाघमारे, मधुकर लोणसुने, दत्ता खोमणे हे उपस्थित होती. यवतमाळ - पुणे मार्गे वाशीम जाणाºया बसच्या वाहक - चालकाचा भगवा रूमाल श्रीफळ देऊन गजाननराव वडजीकर देशमुख, सुरेश मापारी, अशोक , श्रीराम शिराळ यांनी केला.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सुरू केलेल्या शिवशाही बस मध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे खाजगी बसच्या तुलतेत सुखकर सुरक्षीत प्रवास होणार असल्याचे कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष गजाननराव वडजीकर तर लाब पल्याचा रात्रीचा प्रवास करण्यासाठी सोय उपलब्ध झाली आहे. असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुरेश मापारी यांनी सांगितले