महावीर जन्मोत्सवानिमित्त शिरपूरमध्ये शोभायात्रा
By admin | Published: April 9, 2017 02:17 PM2017-04-09T14:17:23+5:302017-04-09T14:17:23+5:30
जैनाची काशी समजल्या जाणाºया शिरपूरनगरीत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.
वाशिम - भगवान महावीर जयंतीनिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. जैनाची काशी समजल्या जाणाऱ्या शिरपूरनगरीत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.
वाशिम येथे दोन शोभायात्रा काढण्यात आल्या. बालाजी मंदिरासमोरील जयस्तंभ येथून एका शोभायात्रेला सुरूवात झाली तर दुसऱ्या शोभायात्रेची सुरूवात सुभाष चौक येथून झाली. या दोन्ही शोभायात्रेत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शिरपूर जैन येथे दिगंबर जैन समाजबांधवांच्यावतीने महावीर जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता जैन मंदिर येथे भगवान महावीर यांच्या मूर्तिचे पूजन व अभिषेक केला. त्यानंतर संस्थानमधून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. पोलीस स्टेशनलगत असलेल्या महावीर किर्ती स्तंभाजवळ मिरवणूक आली असता तेथे अॅड. विलास महाजन यांच्या पत्नीच्या हस्ते धर्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तेथून पालखी मिरवणूक ऐतिहासिक पवळी मंदिराकडे मार्गस्थ झाली. येथे प्रभूंचे पूजन अभिषेक करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व जैन भाविकांना प्रसाद स्वरुपात अल्पोपहार देण्यात आला.