‘वॉटर कप’ स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीचा जयपूर येथे जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:19 AM2017-08-28T01:19:06+5:302017-08-28T01:19:14+5:30

कारंजा लाड: सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा जल्लोष २७ ऑगस्ट रोजी जयपूरवासियांनी केला. यावेळी  प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करून जयपूर गावाला पाणीदार करण्यात मोलाची भूमिका वठविणार्‍या अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचा जयपूरवासियांनी सत्कारही केला. या   सोहळय़ाला माजी राज्यमंत्री बाबासाहेब धाबेकर यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आमदार राजेंद्र पाटणी, तसेच सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.  

Shocking performance at 'Water Cup' competition at Jaipur | ‘वॉटर कप’ स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीचा जयपूर येथे जल्लोष

‘वॉटर कप’ स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीचा जयपूर येथे जल्लोष

Next
ठळक मुद्देमान्यवरांची उपस्थितीभव्य सोहळय़ात सहकार्य करणार्‍यांचा सत्कार 

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड: सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा जल्लोष २७ ऑगस्ट रोजी जयपूरवासियांनी केला. यावेळी  प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करून जयपूर गावाला पाणीदार करण्यात मोलाची भूमिका वठविणार्‍या अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचा जयपूरवासियांनी सत्कारही केला. या   सोहळय़ाला माजी राज्यमंत्री बाबासाहेब धाबेकर यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आमदार राजेंद्र पाटणी, तसेच सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.  
पाणी फांउडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २0१७ मध्ये कारंजा तालुक्यातील जयपूर या छोट्याशा गावाने तालुकास्तरावरील प्रथम पारितोषीक पटकावले. या स्पर्धेदरम्यान जयपूरवासियांना सहकार्य करणारे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने रविवारी जयपूर ग्रामपंचायत व गावकर्‍यांच्यावतीने कृतज्ञता सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाबासाहब धाबेकर, तर प्रमुख अतिथी म्हणून कारंजा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, तहसिलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी दिनकर पवार, पाणी फांउडेशनचे प्रशिक्षक पवन मिश्रा, माजी समाजकल्याण सभापती जयकिसन राठोड, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ राजीव काळे आदिंची उपस्थिती होती. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांनी जयपूर या गावाला शासनाच्या विविध योजनाच्या माध्यमातून तथा विकास निधीतूून निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे आश्‍वासन देतानाच तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील ईतर गावांनीही जयपूरवासियांकडून प्रेरणा घेऊन अशी चळवळ उभी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनीही जयपूरवासियांनी एक जुट दाखविल्यामुळे प्रशासनाला त्यांच्या मदतीला धाऊन यावेच लागले, असे मत व्यक्त केले. दरम्यान, या स्पर्धेत कारंजा तालुक्यातीन धनज गावाने द्वितीय, तर जानोरी गावाने तृतिय पारितोषिक पटकावल्याबद्दल या गावांचे सरपंच व त्यासाठी परीश्रम घेणार्‍या ‘वॉटर हिरोज’चा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेसाठी सहकार्य केल्याबद्ल आमदार पाटणी, जिल्हाधिकारी  व्दिवेदी, जिल्हाकृषी अधिकारी गावसाने, उपविभागीय अधिकारी डॉ. जावळे, तहसिलदार पाटील, गटविकास अधिकारी पवार, पाणी फांऊडेशन प्रशिक्षक पवन मिश्रा, तालुका समन्वयक प्रफुल बानगांवकर, श्याम सवाई, गोपाल पाटील भोयर, सुधिर देशपांडे, प्रा. ए. एस. शेख, फिरोज शेकुवाले, दिपक पवार, विजय काळे, विजय भड, दिलीप राऊळ व स्वंयसेवी संस्था रणजीत पाटील महल्ले, काकडशिवनी चे सजंय मालवे मित्र मंडळ, राधाताई मुरकुटे, वर्षा भगत, अविनाश मुथोळकर, भारतीय जैन संघटनेचे प्रज्वल गुलालकरी, अँड जिंतूरकर, ऑर्ट आफ लिव्हींगचे प्रा. डोंगरे, चांडक, सुनिल चव्हाण, ग्रामसेवक नरेश गजभिये, देवेंद्र मुकुंद, कृषी सहाय्यक मंगेश सोळंके, ग्रामपंचायत कर्मचारी संदिप गवई, ग्रामरोजगार सेवक सय्यद सादीक, सतांेष राठोड आदिंचा स्मृती चिन्ह व  पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच विजय पाटील काळे, तर  संचालन विजय मापारी व आभार प्रदर्शन ग्रामसेवक नरेश गजभिये यांनी केले. 

ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेच जयपूर पाणीदार !
कारंजा लाड: ‘गावकरी ते राव न करी’ हे जुनी म्हण प्रख्यात आहे. जयपूरवासियांनी वॉटर कप स्पर्धेत एकजुट दाखवत प्रथम पारीतोषिक पटकावून ही म्हण प्रत्यक्षात उतरविली आहे. गावकर्‍यांच्या एकजुटीमुळेच जयपूर गाव पाणीदार झाले, असे मत माजी जलसंधारण मंत्री बाबासाहेब धाबेकर यांनी कृतज्ञता सोहळय़ात अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. गावकर्‍यांची एकजुट असल्यास गावाचा विकास करणे सहज शक्य होऊ शकते. त्यांचे ज्वलंत उदाहरण म्हणून जलसंधारणाच्या कामांत जयपूर वासियानी दाखविलेल्या एकजुटीपेक्षा दुसरे असूच शकत नाही, असेही ते म्हणाले.  
-

Web Title: Shocking performance at 'Water Cup' competition at Jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.