धक्कादायक... मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीची दगडाने ठेचून हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:21 PM2018-06-16T18:21:44+5:302018-06-16T18:21:44+5:30

वाशिम :  वनोजा (ता. मंगरूळपीर जि.वाशिम) येथील ज्योती तुकाराम कुरवाडे या २० वर्षीय महिलेला मुलगी झाल्यामुळे तिच्या पतीने दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना कंझरा शेतशिवारात १५ जुन रोजी घडली. पोलीसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. 

Shocking ... wife's murdered as she gave birth to a daughter | धक्कादायक... मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीची दगडाने ठेचून हत्या 

धक्कादायक... मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीची दगडाने ठेचून हत्या 

Next
ठळक मुद्देतुकाराम हा दवाखान्यामध्ये पत्नीला भेटायला गेला त्यावेळीच त्याने मुलगी झाल्यामुळे संताप व्यक्त करून पत्नीसोबत कडाक्याचे भांडण केले होते. त्याने पत्नी ज्योती हिला घराबाहेर आपल्याला आधार कार्ड काढायचे आहे असे सांगुन सकाळी ११ वाजता घराबाहेर घेऊन गेला.  पोलीसांनी तुकाराम याला ताब्यात घेऊन घटनास्थळ गाठले. घटनास्थळावर ज्योतीच्या डोक्यावर मोठमोठे दगड टाकून तीची हत्या केल्याचे उघडकीस आले.


वाशिम :  वनोजा (ता. मंगरूळपीर जि.वाशिम) येथील ज्योती तुकाराम कुरवाडे या २० वर्षीय महिलेला मुलगी झाल्यामुळे तिच्या पतीने दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना कंझरा शेतशिवारात १५ जुन रोजी घडली. पोलीसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. 
शेलूबाजार (ता. मंगरूळपीर जि.वाशिम) येथील ज्योती पानभरे (माहेरचे नाव) हिचा एक वर्षापूर्वी वनोजा (ता. मंगरूळपीर जि.वाशिम) येथील तुकाराम कुरवाडे याचेशी विवाह झाला. तुकाराम कुरवाडे हा मजुरीचे काम करतो. लग्नानंतर काही दिवसाने ज्योती व तुकाराम या दोघांमध्ये छोट्याशा कारणावरून भांडण होत असे. ज्योती हिला गर्भधारणा झाल्यानंतर प्रसुतीसाठी ती माहेरी शेलुबाजार येथे गेली होती. ज्योतीची शेलुबाजार येथे खासगी रूग्णालयात प्रसुती झाली. तीला मुलगी झाल्याचे वृत्त पती तुकाराम यांना मिळाले. तुकाराम हा दवाखान्यामध्ये पत्नीला भेटायला गेला त्यावेळीच त्याने मुलगी झाल्यामुळे संताप व्यक्त करून पत्नीसोबत कडाक्याचे भांडण केले होते. तेंव्हापासून तुकाराम अस्वस्थ असायचा. 
तुकाराम हा १५ जुन रोजी शेलुबाजार येथे आपल्या सासुरवाडीला आला. त्याने पत्नी ज्योती हिला घराबाहेर आपल्याला आधार कार्ड काढायचे आहे असे सांगुन सकाळी ११ वाजता घराबाहेर घेऊन गेला. तेंव्हापासून दोघेही रात्री उशिरापर्यंत घरी न पोहचल्याने कुटूंबीयांनी पोलीसांकडे धाव घेतली. पोलीसांनी लगेचच ज्योतीचा पती तुकाराम याला ताब्यात घेतले. परंतू तुकाराम याने गुन्ह्याची कबुली न दिल्यामुळे त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. पोलीसांनी तुकाराम याला ताब्यात घेऊन घटनास्थळ गाठले. घटनास्थळावर ज्योतीच्या डोक्यावर मोठमोठे दगड टाकून तीची हत्या केल्याचे उघडकीस आले. वृत्त लिहेस्तोवर मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: Shocking ... wife's murdered as she gave birth to a daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.