कर्जमाफीसाठी ‘शोले स्टाईल’ आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 04:55 PM2021-11-08T16:55:17+5:302021-11-08T16:55:23+5:30
'Shole style' Agitation for debt waiver : शेतकºयांनी ८ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास दापुरा येथील जलकुंभावर ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले.
दापूरा (वाशिम) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मधील अनेक पात्र शेतकºयांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांसह शेतकºयांनी ८ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास दापुरा येथील जलकुंभावर ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले.
सततच्या नापिकीमुळे अनेक शेतकºयांना कर्जाचा नियमित भरणा करता येत नाही. कर्जाचा बोजा वाढत गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात ढकलला गेला. सर्वच स्तरातून कर्जमाफीची मागणी झाल्याने सन २०१७ मध्ये कर्जमाफी जाहिर करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ मध्ये पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. दापूरा परिसरासह मानोरा तालुक्यातील अनेक पात्र शेतकºयांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन केले होते. परंतू, याची दखल घेण्यात आली नाही. अनेक पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याने याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न म्हणून शिवसैनिक व शेतकºयांनी ८ नोव्हेंबर रोजी दापूरा येथील जलकुंभावर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. यावेळी शिवसेना सर्कल प्रमुख बाळू राठोड, अविनाश राठोड, संतोष जाधव, जगदीश आडे यांच्यासह शेतकºयांची उपस्थिती होती.
कर्जमाफीचा लाभ मिळावा!
पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देताना नेमकी कोणती अडचण आहे, कोणत्या त्रूटी आहेत याची माहिती शेतकºयांना मिळणे अपेक्षीत आहे. चार वर्षानंतरही कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याने शेतकº यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी मागणी पात्र शेतकºयांनी केली.