तूरीची खरेदी बंद; सोयाबिनचे गडगडले दर!
By admin | Published: June 18, 2017 07:21 PM2017-06-18T19:21:24+5:302017-06-18T19:21:24+5:30
शेतकरी आर्थिक विवंचनेत : खरिपातील पेरणीच्या कामांवर परिणाम.
वाशिम : केंद्रशासनाकडून परवानगी नसल्यामुळे ह्यनाफेडमार्फतची तूर खरेदी गत ८ दिवसांपासून बंद आहे. दुसरीकडे सोयाबिनलाही २८00 रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर मिळणे मुश्किल झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या विवंचनेत सापडले असून त्याचा थेट परिणाम खरिपाच्या पेरणीवर झाला आहे.
नाफेडकडून ५0५0 रुपये प्रतिक्विंटल या हमीदराने केली जाणारी तूर खरेदी १0 जूनपासून बंद आहे. परिणामी, ३१ मे पयर्ंत बाजार समित्यांमधून टोकन घेतलेल्या १७ हजारांपेक्षा अधिक शेतकर्यांची साडेचार लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर घरात पडून आहे. शेकडो शेतकर्यांना तुर विकूनही चुकारे मिळालेले नाहीत. एकूणच या समस्यांमुळे तूर उत्पादक शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. खरिपातील मुख्य पीक म्हणून गणल्या जाणार्या सोयाबिनचीही हीच गत झाली असून पेरणीसाठी हाती पैसा राहावा, या उद्देशाने शेतकर्यांनी साठवून ठेवलेले सोयाबिन विक्रीसाठी बाहेर काढले आहे; परंतू उच्चदर्जाच्या सोयाबिनला २८00 रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.