दुकाने बंद; नागरिक सैराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:56 AM2021-02-25T04:56:24+5:302021-02-25T04:56:24+5:30
जिल्ह्यातील सर्व प्रकारची उपाहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता केवळ पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु ...
जिल्ह्यातील सर्व प्रकारची उपाहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता केवळ पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी पार्सल सुविधेसह बसण्याचीसुद्धा व्यवस्था केल्याचे दिसून येत आहे. वाशिम नगर परिषदेच्या वतीने शहरात दरराेज ५ वाजण्यापूर्वीच वाहन फिरवून ५ वाजता दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येते. त्यानंतरही दुकाने सुरू आहेत का? याची पाहणी नगर परिषद प्रशासनासह पाेलीस कर्मचारी करताना दिसून येतात. परंतु दुकाने बंद झाल्यानंतर शहरात सर्वत्र शुकशुकाट निर्माण झाल्यानंतर काही युवक, नागरिक काहीही काम नसताना शहरात फिरताना दिसून येत आहे. बाजारपेठच बंद झाल्यानंतर शहरात हे युवक, नागरिक कशासाठी फिरताहेत? अत्यावश्यक सेवा संचारबंदी काळातही सुरू राहत असल्याने तेव्हाच आपली कामे उरकून घेण्यात यावी असे सुज्ञ नागरिकांतून बाेलले जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन काही काम नसताना शहरात फिरणाऱ्यांवर कारवाई केल्यास काेराेना संसर्ग कमी हाेऊ शकेल. त्याकरिता प्रशासनाने कठाेर पावले उचलणे आवश्यक असल्याचे नागरिक बाेलत आहेत.
-----------
संचारबंदीला व्यापाऱ्यांकडून मिळताेय प्रतिसाद
जिल्हाधिकारी श्णमुगराजन एस. यांनी २१ फेब्रुवारी रोजी प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांसाठी संचारबंदीचे सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील. प्रत्येक आठवड्यात शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार असून या काळात सर्व, दुकाने, आस्थापना बंद राहतील. त्या वेळांनुसार व्यापाऱ्यांकडून प्रतिसादही मिळत आहे. परंतु विनाकारण काहीही काम नसताना रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.