वाशिम जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखविण्यात आला पंतप्रधानांच्या जीवनावरील लघुपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:30 PM2018-09-18T13:30:38+5:302018-09-18T13:31:34+5:30
वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ हा लघुपट जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सकाळच्या सत्रात दाखविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ हा लघुपट जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सकाळच्या सत्रात दाखविण्यात आला. काही शाळांना आवश्यक ते संगणक व अन्य साहित्याची ऊसनवारी करावी लागली.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक मंगेश हडवळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'चलो जीते हैं' हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. या अर्ध्या तासाच्या लघुपटाचे प्रक्षेपण ‘लाइव्ह स्ट्रिमिंग’द्वारे १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० व दुपारी ३ वाजता शाळांमध्ये करावे, यासाठी सर्व शाळांनी तांत्रिक पूर्वतयारी करावी अशा सूचना वरिष्ठ स्तरावरून जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या होत्या. सर्व शाळांनी या लघुपटाच्या प्रक्षेपणासाठी ‘लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कम्प्युटर’ची सोय करावी, त्याचबरोबर किमान एक एमबीपीएस वेग असलेले इंटरनेट जोडणी, प्रोजेक्टर व स्क्रीन आणि स्पीकर्सची व्यवस्था करण्याचे आदेशही दिले होते. ज्या शाळांमध्ये संगणक व अन्य सुविधा नाहीत तसेच वीजपुरवठा खंडीत झालेला आहे, अशा शाळांमध्ये ऊसनवारीने आवश्यक ते साहित्य आणण्यात आले होते. मंगळवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता हा लघुपट जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये दाखविण्यात आला. प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांच्या उपस्थितीत मेडशी येथील जिल्हा परिषद शाळेत हा लघुपट दाखविण्यात आला.