गैरहजर अंगणवाडी सेविकांना ‘शो-कॉज’
By admin | Published: April 10, 2017 04:25 PM2017-04-10T16:25:09+5:302017-04-10T16:25:09+5:30
पथकाने दिलेल्या भेटीदरम्यान गैरहजर आढळणाºया अंगणवाडी सेविकांना कारणे नोटीस बजावण्यात आली.
वाशिम - पथकाने दिलेल्या भेटीदरम्यान गैरहजर आढळणाऱ्या अंगणवाडी सेविकांना कारणे नोटीस बजावण्यात आली. शुक्रवारपासून हाती घेतलेली ही मोहिम सोमवारही सुरू होती.
अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून बालमनावर शैक्षणिक संस्कार रूजविले जातात. प्राथमिक शिक्षणाचा पाया म्हणून अंगणवाडी केंद्रांकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील बालकांना अंगणवाडीतून दर्जेदार शिक्षण मिळावे, केंद्राचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांच्या पथकाने अंगणवाडी केंद्रांना आकस्मिक भेटी सुरू केले. शनिवार व सोमवारी नेतन्सा, नावली, मांगुळ झनक, अंचळ, कुकसा, केनवड, कळमगव्हाण, नंधाना, कोयाळी खु येथे अचानक देऊन तपासण्या केल्या. सकाळी ८ वाजतापासून पथक अंगणवाडीमध्ये धडकत असल्याने कामचुकार सेविकांची धावपळ उडत आहे. गैरहजर आढळलेल्या सर्व अंगणवाडी सेविकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, असे मदन नायक यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. तपासणी पथकात मदन नायक, अंगणवाडी सेविका मेश्राम, झळके आदींचा समावेश आहे.