‘लोकमत’चा दणका : गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:34 PM2019-07-30T12:34:10+5:302019-07-30T12:38:09+5:30
गैरहजर कर्मचाºयांकडून खुलासे मागविण्यात येणार असून, दोषी आढळून येणाºयांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार २८ जुलै रोजी मतदान केंद्रांवर राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान काही ठिकाणी कर्मचारी अनुपस्थित आढळून आले. गैरहजर कर्मचाºयांकडून खुलासे मागविण्यात येणार असून, दोषी आढळून येणाºयांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १५ जुलैपासून नवीन मतदारांची नोंदणी मोहिम राबविली जात आहे. मतदार नोंदणीपासून कुणीही वंचित राहू नये तसेच मतदार कार्डामधील चुकांची दुरूस्ती व्हावी याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, निवडणूक विभाग व गावपातळीवरील कर्मचाºयांची फौज नवमतदारांच्या सेवेत तैनात करण्यात आली आहे. सुट्टीच्या दिवशीही मतदान केंद्रांवर उपस्थित राहून मतदार नोंदणी मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी यंत्रणेला दिले होते.
मोहिमेची अंमलबजावणी प्रभावी व्हावी याकरीता जिल्हाधिकारी मोडक व संबंधित तहसिलदारांनी रविवार, २८ जुलै रोजी काही मतदानकेंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. दरम्यान, लोकमत चमूने रिसोड शहरासह काही ठिकाणी दुपारच्या सुमारास मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली असता काही ठिकाणी कर्मचारी आढळून आले नाहीत तर काही ठिकाणी संबंधित मतदान केंद्र कुलूपबंद आढळून आले. यामध्ये रिसोड शहरातील सर्वाधिक सात मतदान केंद्रांचा समावेश होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने २९ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करताच, प्रशासनाने दखल घेतली असून संबंधितांकडून खुलासे मागविण्यात आले आहेत. रिसोड शहर व तालुक्यातील संबंधित मतदान केंद्रांची माहिती घेऊन सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे तहसिलदार राजेश सुरडकर यांनी स्पष्ट केले.
वाशिम तालुक्यातील पांडवउमरा परिसरातील मतदान केंद्रासंदर्भात वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे.
मतदार नोंदणी करण्याचे आवाहन
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदारांची नोंदणी मोहिम १५ जुलैपासून जिल्ह्यात राबविली जात आहे. १५ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत मतदार यादीमध्ये नाव नोंदविता येणार आहे तसेच मतदार यादीतील दुरुस्ती, सुधारणाही करता येणार आहे. या मोहिमेदरम्यान प्रत्येक पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करावी आणि नाव नसल्यास ३० जुलैपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांसह नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.