दोन अधिका-यांसह २५ कर्मचा-यांना ‘कारणे दाखवा’
By admin | Published: November 28, 2015 02:47 AM2015-11-28T02:47:38+5:302015-11-28T02:58:02+5:30
नगर परिषद कर्मचारी दांडी प्रकरण.
वाशिम : कामाच्या वेळेत गैरहजर असणार्या नगर परिषदेच्या दोन अधिकारी व २३ कर्मचार्यांना सहायक कार्यालय निरीक्षक यांनी २६ नोव्हेंबर रोजी कारणे दाखवा नोटिसेस बजावल्यात. यामध्ये बांधकाम विभागाचे इंजिनिअर विनय देशमुख, सहायक समाज कल्याण अधिकारी सुरेश राठोड यांचा समावेश आहे. शहरातील नागरिकांना नगर परिषदेमध्ये विविध कामे करताना अधिकार्यांच्या अनुपस्थितीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात २५ नोव्हेंबर रोजी सविस्तर वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत नगराध्यक्ष लता उलेमाले यांना दांडीमार कर्मचार्यांची चौकशी करुन त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांना सुटीच्या दिवशीच (गुरु नानक जयंती ) २५ नोव्हेंबर रोजी केल्या होत्या. त्यानुसार २६ नोव्हेंबरला बांधकाम विभागाचे इंजिनिअर विनय देशमुख, सहायक समाज कल्याण अधिकारी सुरेश राठोड, संगणक विभागाचे ए.बी. भगत यांच्यासह २३ चतुर्थ ङ्म्रेणी अनुपस्थित कर्मचार्यांना कारणो दाखवा नोटिसेस बजावण्यात आल्याची माहिती सहायक कार्यालय निरीक्षक बी.डी. देशमुख यांनी दिली. नगर परिषदेमधील विविध विभागातील अधिकारी बाहेर दौर्यावर किंवा काही कामानिमित्त बाहेर गेल्याचे सांगून भिंतीवर लावलेल्या अधिकार्यांच्या नंबरवर संपर्क करण्याचे उपस्थित शिपायाकडून सांगण्यात येते. अधिकार्यांचा भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, मात्र तो लागत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, अनेक चकरा नगर परिषदेमध्ये माराव्या लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते.