सहा बीडीओंना कारणे दाखवा नोटिस
By admin | Published: December 4, 2015 02:49 AM2015-12-04T02:49:28+5:302015-12-04T02:49:28+5:30
जलव्यवस्थापन समितीची सभेत हातपंप दुरूस्ती व देखभालसंदर्भातील अहवाल सादर न करणा-या बीडीओंना कारणे दाखवा नोटिस.
वाशिम : हातपंप दुरूस्ती व देखभालसंदर्भातील अहवाल सादर न करणार्या जिल्ह्यातील सहाही पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड यांनी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत केल्या. ३ डिसेंबरला जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात पार पडलेल्या या सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती चक्रधर गोटे, पानू जाधव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता हातपंप दुरूस्ती व देखभालबाबत अहवाल मागविण्याच्या सूचना गटविकास अधिकार्यांना वारंवार केल्या होत्या; मात्र अद्यापही त्यांनी अहवाल सादर केला नाही. कर्तव्यात दिरंगाई करणार्या अधिकार्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्याच्या सूचना सोनाली जोगदंड यांनी संबंधित अधिकार्यांना केल्या.