जल, माती, वृक्ष संवर्धनाकरिता श्रमदान
By admin | Published: April 29, 2017 02:51 PM2017-04-29T14:51:39+5:302017-04-29T14:51:39+5:30
विद्यार्थ्यांनी अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप या गावात जावुन जल माती वृक्ष तसेच लोकांचे मन संवर्धनाकरिता श्रमदान केले.
वाशिम : जवाहर नवोदय विद्यालय वाशिम येथील राष्ट्रीय सेवा योजना व स्काउट गाईडच्या ३० विद्यार्थ्यांनी अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप या गावात जावुन जल माती वृक्ष तसेच लोकांचे मन संवर्धनाकरिता श्रमदान केले.
हा कार्यक्रम काळाची गरज लक्षात घेवुन महाराष्ट्र शासन तसेच हिंदी चित्रपट अभिनेते अमितर खान, त्यांच्या पत्नी किरण राव तसेच सत्यजीत भटकल याच्या संयुक्त विद्यमाने पाणी फाउंडेशन व सत्यमेव जयते या कार्यक्रमांतर्गत वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ३० तालुक्याची निवड करण्यात आलेली असुन त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने गावातील नागरिक, विविध सामाजिक संघटना तसेच शैक्षणिक संघटना सहभागी होत आहेत. कान्हेरी सरप येथे नवोदय विद्यालय वाशिम च्या ३० विद्यार्थ्यांनी ५ मिटर व लांब २ फुट रुंद व १ फुट खोल असे चार सलग समतल स्तर तयार केले तसेच मातीचे बंधारे घातले व जलसंवर्धन माती संवर्धन तसेच वृक्षसंवर्धन काम श्रमदानातुन केले. या कार्याकरिता विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक एस.जी.पवार, पिजीटी इतिहास तसेच शारिरीक शिक्षक डी.के.साखरे यांचे सहकार्य लाभले.