रिसोड येथे श्रामणेर शिबिराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 04:31 PM2020-02-03T16:31:32+5:302020-02-03T16:31:37+5:30
एकता नगरातील बुद्ध विहारात २४ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या दरम्यान आयोजित श्रामणेर शिबिराचा समारोप ३ फेब्रुवारी रोजी करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : भारतीय बौद्ध महासभा शाखा रिसोडच्यावतिने स्थानिक एकता नगरातील बुद्ध विहारात २४ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या दरम्यान आयोजित श्रामणेर शिबिराचा समारोप ३ फेब्रुवारी रोजी करण्यात आला.
संघनायक पुज्य भन्ते डॉ.कौण्डिण्य (बेंगलोर), पुज्य भन्ते नागसेन (जालना) यांनी १० दिवस श्रामणेरांना उपदेश दिला. प्रशिक्षक संबोधी सोनकांबळे (नांदेड) व समता सैनिक दल प्रशिक्षण करिता ग्यानोबा टोम्पे होते. सुभेदार रामजी बाबा स्मृतीदिनाचे औचित्य व शिबिराचा समारोप या दिवशी एकता नगरातुन भव्य रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शालिकराम पठाडे होते. यावेळी जि.प. समाजकल्याण सभापती वनिता देवरे, सिद्धार्थ देवरे, प्रा, नंदकिशोर खैरे, सिद्धार्थ भगत, संध्याताई पंडित, प्रा. यु.एच. बलखंडे आदींची उपस्थिती होती. सिद्धार्थ देवरे यांनी समाजाची आजची स्थिती व आव्हाने या विषयावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला हरिश्चंद्र पोफळे, नागोराव उचीत ,देवानंद वाकोडे, छगण सरकटे, अनिल गरकळ, गिरीधर शेजुळ, भारत कांबळे ,सुरेश मोरे प्रा,दामोदर धांडे, रामभाऊ अंभोरे, दाजिबा खरात ,मोहन धांडे आदींची उपस्थिती होती. श्रामणेर संघाची मोफत तपासणी व औषधी डॉ, भिमराव धांडे यांनी पुरविली. शिबीर यशस्वी करण्यासाठी माधव हिवाळे, रामजी बानकर, अभिमन्यु पंडित, मंदाताई धांडे, उषाताई खंडारे, महानंदा वाठोरे , देविदास सोनुने, भिवाजी खंडारे यांनी परिश्रम घेतले. संचालन रामजी बानकर तर आभार माधव हिवाळे यांनी केले.