श्रीं’च्या पालखीचे २६ जून रोजी ‘वाशिम जिल्ह्यात होणार आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 03:09 PM2018-06-07T15:09:58+5:302018-06-07T15:09:58+5:30
मालेगाव : शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे २६ जून रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यात आगमन होत आहे. १६ जूनला सकाळी १० वाजता सदर पालखी मेडशी येथे पोहोचणार आहे.
मालेगाव : शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे २६ जून रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यात आगमन होत आहे. १६ जूनला सकाळी १० वाजता सदर पालखी मेडशी येथे पोहोचणार आहे.
२६ जून ला सकाळी १० वाजता मेडशी येथे परिसरातील भाविकांना ‘श्रीं’चे दर्शन घेता येणार आहे. वारकº्यांना जि. प. प्राथमिक शाळेत भोजन देण्यात येईल. त्यानंतर पालखी श्री क्षेत्र डव्हाकरिता रवाना होईल. मार्गात ब्राम्हनवाडा येथे स्वागत होईल. त्यानंतर पालखी सुकांडा आणि नंतर श्री नाथनंगे महाराज संस्थान श्री क्षेत्र डव्हा येथे पोहोचणार आहे. सायंकाळी आरती व नंतर वारकºयांना संस्थानतर्फे भोजन देण्यात येणार आहे. त्यानंतर श्री हरिकीर्तन व भजन होईल. येथे मुक्काम केल्यानंतर, २७ जून रोजी सूर्योदयावेळी आरती, नंतर पालखी मालेगावकरिता रवाना होईल. मार्गात डव्हा फाट्यावर खिर्डाच्या ग्रामस्थांतर्फे चहा व फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. नंतर पालखी मालेगाव येथे येणार आहे. शहरात पालखीचे स्वागत रांगोळी काढून व स्वागत कमानी उभारून करण्यात येणार आहे. याची जय्यत तयारी शहरवासी व भाविकांच्यावतीने केली जाते. मध्यान्ह भोजनानंतर पालखी शिरपूरकरिता रवाना होणार आहे.