श्री नाथ नंगे महाराज संस्थानात जनसागर लोटला !
By Admin | Published: February 4, 2017 01:41 AM2017-02-04T01:41:51+5:302017-02-04T01:41:51+5:30
डव्हा येथे २00 क्विंटल महाप्रसादाचे वितरण; यात्रा महोत्सवाची सांगता, दर्शनासाठी भाविकांची रिघ.
मालेगाव, दि. 0३- श्रीक्षेत्र डव्हा येथील श्री नाथनंगे महाराज संस्थान येथील यात्रा महोत्सवांची सांगता ३ फेब्रुवारीला रथसप्तमीला भव्य महाप्रसादाने झाली. जवळपास एक लाख भाविकांनी श्री नाथ नंगे महाराजांच्या चरणी नतमस्तक होत महाप्रसादाचा लाभ घेतला. २00 क्विंटल महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
विदर्भाची ह्यपंढरीह्ण म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र डव्हा संस्थानवर रथसप्तमीला भव्य यात्रोत्सव असतो. नाथ नंगे महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळते. या महोत्सवाला २८ जानेवारीपासून सुरूवात झाली होती. ३ फेब्रुवारीला भव्या महाप्रसादाने या यात्रोत्सवाचा समारोप झाला. महाप्रसादासाठी ७५ क्विंटल गहू, ५0 क्विंटल भाजी, बुंदीसाठी १५ क्विंटल बेसन, साखर ३0 क्विंटल, तेल ३0 क्विंटल असे साहित्य लागले. सकाळी सुर्योदयाच्या वेळी श्री नाथनंगे महराज व प.पू. विश्वनाथ बाबांच्या समाधी व मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती झाली. ह्यश्रींह्णच्या पालखीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
दूपारी ४ वाजता महाप्रसादाची पूजा करण्यात आली. त्यानंतर मिरवणुक काढत महाप्रसाद वितरणस्थळी आणण्यात आला. शिस्तबद्धरित्या भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. पंगत बसवून महाप्रसाद ट्रॅक्टरद्वारे वितरित करण्यात आला.
महाप्रसाद वितरणाकरिता २५00 स्वयंसेवकांनी सेवा दिली. ५0 ट्रक्टरमधुन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पाणी वाटपासाठी ६ टँकर होते. रथसप्तमीला प. पू. नाथनंगे महाराजांनी प.पू. विश्वनाथ बाबांच्या शरीरात परकाया प्रवेश श्री क्षेत्र माहूर येथे केला होता. त्याचे स्मरण म्हणून या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात या वर्षी एक लाख भाविक सहभागी झाले होते, असा दावा करण्यात आला. आमदार अमित झनक, जि.प. सभापती सुधीर गोळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, जिल्हा परिषद सदस्य शाम बढे., रत्नप्रभाबाई घुगे, शामसुंदर मुंदडा, मुकुंदराव मेडशिकर, सुभाषराव घुगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यात्रा महोत्सवात रोगनिदान शिबिर,जनजागृती शिबिर यांचे आयोजन केले होते. बच्चे कंपनीसाठी विविध प्रकारचे खेळ, साहित्य, चित्रपटगृह यात्रेत थाटली आहेत.
'लोकमत'च्या 'तुझे तुलाच' या विशेष पानाचा गौरव
श्री नाथ नंगे महाराज श्रीक्षेत्र डव्हा यांच्या पुण्यतिथिनिमित्त ह्यलोकमतह्णने विशेष पानाच्या माध्यमातून नाथनंगे महाराज, विश्वनाथ बाबा, डव्हा संस्थान व एकंदर यात्रोत्सवाचा आढावा घेतला. या विशेष पानाचा गौरव यात्रेच्या मुख्य दिवशी संस्थानचे पदाधिकारी व मान्यवरांकडून करण्यात आला.