रथसप्तमीची डव्हा येथील श्री नाथनंगे महाराज यात्रा व महाप्रसाद दद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:20 AM2021-01-24T04:20:33+5:302021-01-24T04:20:33+5:30
दरवर्षी रथसप्तमीच्या दिवशी येथे श्री. नाथनंगे महाराज व प.पू. विश्वनाथ महाराजाची मोठी यात्रा भरते. या यात्रेला महाराष्ट्रातील लाखो भाविक ...
दरवर्षी रथसप्तमीच्या दिवशी येथे श्री. नाथनंगे महाराज व प.पू. विश्वनाथ महाराजाची मोठी यात्रा भरते. या यात्रेला महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्त येत असतात. पण या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे महाराष्ट्रातील यात्रांवर बंदी घातली आहे. त्यामुळे डव्हा येथील फेब्रुवारीच्या १९ तारखेला रथसप्तमीच्या दिवशीची येथील यात्रा रद्द करण्यात आली आहे. तर सस्थेच्यावतीने व जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनच्या वतीने जऊळका येथे २२ जानेवारी रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी केडगे, प्रभारी तहसीलदार रवी राठोड, ठाणेदार मोरे यांच्या मार्गदर्शनात श्री नाथ नंगे महाराज संस्थान डव्हा पदाधिकारी यांची सभा घेण्यात आली. यावेळी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थानकडून यात्रा व महाप्रसाद रद्द करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.
डव्हा संस्थानची यात्रा कोरोनामुळे यावर्षी संस्थानने रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे संस्थान अभिनंदनास पात्र आहे. नागरिकांनीसुद्धा यावर्षी यात्रेच्या दिवशी संस्थानवर गर्दी करू नये.
रवी राठोड
प्रभारी तहसीलदार मालेगाव
दरवर्षी रथसप्तमीच्या दिवशी येथे श्री नाथनंगे महाराज व प.पू. विश्वनाथ महाराजांची मोठी यात्रा भरते. या यात्रेला महाराष्ट्रातील लाखो भाविक येत असतात. पण यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे महाराष्ट्रातील यात्रांवर बंदी घातली आहे. त्यामुळे डव्हा येथील फेब्रुवारीच्या १९ तारखेला रथसप्तमीच्या दिवशीची येथील यात्रा रद्द करण्यात आली आहे. तर संस्थेच्यावतीने व जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनच्या वतीने जऊळका येथे २२ जानेवारी रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी केडगे, प्रभारी तहसीलदार रवी राठोड , ठाणेदार मोरे यांचे मार्गदर्शनात श्री नाथनंगे महाराज संस्थानच्या पदाधिकाऱ्यांची सभा घेण्यात आली. यावेळी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थानकडून यात्रा व महाप्रसाद रद्द करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.
.............
डव्हा संथानची यात्रा कोरोनामुळे यावर्षी संस्थाने रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे संस्थान अभिनंदनास पात्र आहे. नागरिकांनीसुद्धा यावर्षी यात्रेच्या दिवशी संस्थानवर जाऊ नये.
रवी राठोड
प्रभारी तहसीलदार मालेगाव