ग्रामपंचायत कार्यालयास झुडपांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:54+5:302021-06-25T04:28:54+5:30

-------- आठवडी बाजारात अपघातग्रस्त वाहनांची गर्दी वाशिम: कामरगाव येथील आठवडी बाजार परिसरात अपघातातील क्षतीग्रस्त वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ...

Shrubs to the Gram Panchayat office | ग्रामपंचायत कार्यालयास झुडपांचा विळखा

ग्रामपंचायत कार्यालयास झुडपांचा विळखा

Next

--------

आठवडी बाजारात अपघातग्रस्त वाहनांची गर्दी

वाशिम: कामरगाव येथील आठवडी बाजार परिसरात अपघातातील क्षतीग्रस्त वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात वाहनधारक वाहने नेण्यास उत्सुक नसल्यामुळे आठवडी बाजाराला भंगार बाजाराचेच स्वरूप प्राप्त झाले आहे. पोलीस चौकीत अपुरी जागा असल्याने हा प्रकार घडत आहे.

------------

रोहयोचा मोबदला प्रलंबित

वाशिम: रोजगार हमी योजनेंतर्गत मानोरा तालुक्यात शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाची कामे पूर्ण झाल्यानंतरही अनेक लाभार्थींना लाखो रुपयांचा निधी अद्याप मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

---------------

पुलावरील रस्त्याचे काम अर्धवट

वाशिम: काजळेश्वर येथून जवळच असलेल्या उकर्डा येथे गेल्या वर्षभरापूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे; परंतु या पुलावरून गावात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याचे कामही अर्धवट असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.

-----------

म्हसणी येथे स्वच्छतेबाबत जनजागृती

वाशिम: मानोरा तालुक्यातील इंझोरीपासून नजिकच असलेल्या म्हसणी येथे ग्रामपंचायतकडून कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, या अंतर्गत गुरुवारपासून स्वच्छतेबाबत जनजागृती सुरू करण्यात आली.

----------

इंझोरीतील गोमुखेश्वर संस्थानवर शुकशुकाट

वाशिम: मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोमुखेश्वर संस्थानवर दर सोमवारी भाविकांची गर्दी होते; परंतु यंदा कोरोना संसर्गामुळे सोमवारी ही गर्दी दिसून येत नाही. संस्थानवर दिवसभर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.

===Photopath===

240621\24wsm_1_24062021_35.jpg

===Caption===

ग्रामपंचायत कार्यालयास झुडपांचा विळखा   

Web Title: Shrubs to the Gram Panchayat office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.