कृषी सेवा केंद्रांवर शुकशुकाट!
By Admin | Published: June 8, 2017 02:15 AM2017-06-08T02:15:30+5:302017-06-08T02:15:30+5:30
आसेगाव परिसरातील चित्र : शेती मशागतीला वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव पोस्टे: मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार हजेरीनंतर परिसरात शेतीच्या कामाला वेग आला आहे .
खरिपाच्या पृष्ठभूमीवर शेतातील काडी कचरा वेचणी, शेतीची ढाळणी करण्याचे कामे सुरू आहेत. मात्र, बियाणे खरेदीबाबत शेतकरी घाईत नसल्याने कृषी सेवा केंद्रावर शुकशुकाट दिसत आहे . शासनाकडून करण्यात येणाऱ्या तूर खरेदीत अनेक अडथळे येत असून, महिनाभरापासून टोकन घेऊन बसलेल्या शेतकऱ्यांची तूर मोजणी अद्यापही झाली नाही. अशावेळी पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांची खरेदी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.
त्यातच नाफेडकडे तूर विक्री करूनही महिनाभर शेतकऱ्यांना पैशाची वाट पहावी लागते. त्यामुळे तर मोठी पंचाईत झाली आहे कोणत्याच पिकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत पडला आहे.