मंदिर परिसरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:37 AM2021-07-26T04:37:59+5:302021-07-26T04:37:59+5:30
--------------- ग्रामस्थांची कोरोना चाचणी वाशिम : रोजगारासाठी परजिल्ह्यात गेलेले परिसरातील कामगार गावी परत आले आहेत. त्यांची चाचणी आवश्यक ...
---------------
ग्रामस्थांची कोरोना चाचणी
वाशिम : रोजगारासाठी परजिल्ह्यात गेलेले परिसरातील कामगार गावी परत आले आहेत. त्यांची चाचणी आवश्यक असून, आरोग्य विभागाने कोरोना चाचणीवर अधिक भर दिला असल्याने आता गावागावांत ग्रामस्थांची कोरोना चाचणी केली जात आहे.
-------
प्रशासनाच्या निर्बंधांचे कठोर पालन
पोहा : राज्यात आढळत असलेले डेल्टा प्लसचे रुग्ण लक्षात घेता शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लावण्यात आले. यात कारंजा तालुक्यातील पोहा परिसरात निर्बंधांचे कठार पालन होेत असल्याचे २५ जुलै रोजी दिसून आले.
अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई
वाशिम : कामरगाव परिसरातील गावांत अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर धनज पोलिसांनी २३ आणि २४ जुलै रोजी कारवाई केली. अवैधरीत्या दारूविक्री करीत असल्याचे पोलिसांना कळताच पोलिसांनी तेथे ठिकाणी छापा टाकत दारू जप्त केली.
---------------
शेंदुरजना येथे निर्जंतुकीकरण
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि पावसाळ्यात पसरणारी घाण लक्षात घेता शेंदुरजना आढाव ग्रामपंचायतने गावात गुरुवारपासून निर्जंतुकीकरण मोहीम सुरू केली. या अंतर्गत ट्रॅक्टरवर फवारणी यंत्र बसवून गावातील सर्व भागांत जंतुनाशक औषधी फवारण्यात येत आहे.
----------
नागरिकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन
वाशिम : उंबर्डा बाजार जिल्हा परिषद गटात येणाऱ्या गरजू नागरिकांना जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामपंचायतकडून शुक्रवारी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यासह कोरोना पृष्ठभूमीवर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.
--------
कामरगाव येथील बाजारपेठेत शुकशुकाट
वाशिम : शासनाच्या निर्देशानुसार सोमवारपासून जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली लागू केली. त्यात कामरगाव येथे सायंकाळी ४ पूर्वीच अत्यावश्यक सेवेची दुकानेवगळता अन्यत्र सर्व दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवला.
-----------------
कारपा परिसरात अनियमित वीजपुरवठा
वाशिम : कोेरोना विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी लागू नियमांमुळे ग्रामस्थांना सायंकाळपासून घरात थांबावे लागत आहे. त्यात कारपा परिसरात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ उकाड्याने हैराण झाले आहेत.