वाशिम जिल्ह्यात क्षयरुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 06:50 PM2018-06-29T18:50:46+5:302018-06-29T18:52:42+5:30
वाशिम: जिल्ह्यात १८ जूनपासून क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्यावतीने पथकांचे गठण करण्यात आले असून, ही पथके संवेदनशील भागांत फिरून क्षयरुग्णांचा शोध घेत आहेत. मोहिमेपूर्वी वाशिम जिल्ह्यात १०८९ क्षयरुग्ण शोधून उपचारावर ठेवले असताना आता त्यामध्ये जवळपास २०० रुग्णांची भर पडली असून, या रुग्णांना आरोग्य विभागाच्यावतीने उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात १८ जूनपासून क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्यावतीने पथकांचे गठण करण्यात आले असून, ही पथके संवेदनशील भागांत फिरून क्षयरुग्णांचा शोध घेत आहेत. या मोहिमेपूर्वी वाशिम जिल्ह्यात १०८९ क्षयरुग्ण शोधून उपचारावर ठेवले असताना आता त्यामध्ये जवळपास २०० रुग्णांची भर पडली असून, या रुग्णांना आरोग्य विभागाच्यावतीने उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्ह्यात १८ जूनपासून सुरू झालेल्या क्षयरुग्ण या अंतर्गत थुंकी तपासणी, आवश्यकतेनुसार रक्त तपासणी व क्ष-किरण तपासणी करण्यात येत आहे. त्याशिवाय या मोहिमेंतर्गत क्षयरोगाबाबत असलेले गैरसमज आणि अज्ञानासह अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्नही आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. क्षयरुगणांना संजीवणी ठरणारी डॉटस उपचार पध्दती संशोधकांनी विकसीत केली आहे. भारतात प्रत्येक वर्षी जवळजवळ २० लाख नवीन क्षयरोगी असतात, त्यौकी १० लाख क्षयरोगी थुंकी दुषित आहेत. एका वर्षात एक थुंकी दुषीत क्षयरुग्णांमुळे १० ते १५ लोकांना क्षयरोग होऊ शकतो. प्रत्येक वर्षी भारतात २, ७६,००० लोक क्षयरोगाने मरण पावतात, म्हणजेच २ मिनीटाला ३ रुग्ण क्षयरोगाने मरण पावतात. या पृष्ठभूमीवर क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी राबविण्यात येत असलेल्या क्षयरुग्ण शोध मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यात यंदा जवळपास २०० रुग्ण आढळले असून, यामुळे जिल्ह्यातील क्षयरुग्णांची संख्या १३०० च्यावर पोहोचली आहे.