रेशीम शेतीलाही निसर्गाच्या अनियमिततेचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 02:47 PM2020-02-17T14:47:15+5:302020-02-17T14:47:50+5:30
केवळ ३२८ शेतकºयांनीच रेशीम शेतीसाठी तुती लागवड केली.
वाशिम : पश्चिम वºहाडात इतर पिकांप्रमाणेच रेशीम शेतीलाही निसर्गाच्या अनियमिततेचा फटका बसत आहे. गतवर्षी पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यात मिळून १६०० शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नोंदणी केली असली तरी, केवळ ३२८ शेतकºयांनीच रेशीम शेतीसाठी तुती लागवड केली. त्यामुळे रेशीम शेती वाढविण्याच्या शासनाच्या उद्देशाला तडा जात असल्याचे दिसत आहे.
गेल्या काही वर्षांता वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हमखास व नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी रेशीम उद्योग शेतकºयांना वरदान ठरु शकतो. ही बाब हेरूनच राज्य व केंद्रशासनाच्या विविध योजनांतून रेशीम योजना राबविण्यात येत आहे. शेतकºयांना रेशीम शेतीकडे वळविण्यासाठी दरवर्षी महारेशीम अभियानांतर्गत नोंदणी करण्यात येत आहे. तथापि, पश्चिम वºहाडात इतर पिकांप्रमाणेच निसर्गाच्या अनियमिततेचा फटका रेशीम शेतीलाही बसत असल्याचे गतवेळच्या हंगामातील तुती लागवडीवरून स्पष्ट झाले. गतवर्षी पश्चिम वºहाडातील तब्बल १६०० शेतकºयांनी महारेशीम अभियानांतर्गत नोंदणी केली होती. त्यात वाशिम जिल्ह्यात ५८०, अकोला जिल्ह्यात ५१५, तर बुलडाणा जिल्ह्यात ४९५ शेतकºयांनी केलेल्या नोंदणीचा समावेश होता. तथापि, या तिन्ही जिल्ह्यात मिळून केवळ ३२८ शेतकºयांनी रेशीम शेतीसाठी तुती लागवड केली. त्यात अकोला जिल्ह्यातील १२५, वाशिम जिल्ह्यातील ११३, तर बुलडाणा जिल्ह्यातील १०० शेतकºयांचा समावेश होता. तुती लागवड केली. गतवेळच्या हंगामात मान्सून महिनाभर लांबल्याने शेतकºयांना तुती लागवडीत स्वारस्य वाटले नाही आणि त्यांनी खरीप पिकांची लागवड केली. आता यंदाही महारेशीम अभियानांतर्गत शेतकºयांची नोंदणी सुरू आहे. त्यात अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी, वाशिम जिल्ह्यात मात्र नोंदणी करण्यासही शेतकरी उदासीन असल्याचे या संदर्भात रेशीम विकास अधिकाºयांकडून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
आपल्याकडचे वातावरण रेशीमशेतीसाठी पोषक आहे; परंतु गतवेळी मान्सूनला महिनाभराचा विलंब झाल्याने शेतकºयांची रेशीम शेतीसाठी तुती लागवड करण्यास उदासीनता दिसून आली. यंदा अधिकाधिक शेतकºयांचा याकडे कल वाढविण्याचा प्रयत्न होत आहे.
-अरविंद मोरे,
रेशीम विकास अधिकारी, वाशिम