ताप, सर्दी, खोकल्यासाठी जिल्ह्यात सहा ‘फिव्हर क्लिनिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 04:42 PM2020-04-21T16:42:43+5:302020-04-21T16:42:52+5:30

रुग्णांची याठिकाणी तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. 

Six 'fever clinics' in district for fever, cold, cough | ताप, सर्दी, खोकल्यासाठी जिल्ह्यात सहा ‘फिव्हर क्लिनिक’

ताप, सर्दी, खोकल्यासाठी जिल्ह्यात सहा ‘फिव्हर क्लिनिक’

Next

वाशिम : वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सहा स्वतंत्र ‘फिव्हर क्लिनिक’ सुरु करण्यात आली आहेत. ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास असलेल्या रुग्णांची याठिकाणी तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. 
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेला एकमेव रुग्ण सापडला असला तरी यापुढेही जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. ताप, सर्दी व खोकला हे तसे नेहमीचे आजार आहेत. मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये सुद्धा अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसणाºया व्यक्तींची तपासणी व उपचार करण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे सहा ‘फिव्हर क्लिनिक’ची व्यवस्था केली असून, २२ एप्रिलपासून सदर क्लिनिक सुरु होणार आहेत.  याठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांना आवश्यक प्रशिक्षण व साहित्य, औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असे जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी सांगितले.
ताप, सर्दी व खोकला आदी लक्षणे दिसणाºया व्यक्तींची तपासणी, उपचार करण्यासोबतच त्यांच्या प्रवासाची नोंद सुद्धा ह्य‘फिव्हर क्लिनिक’मध्ये घेतली जाणार आहे. २२ एप्रिलपासून रोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही ‘फिव्हर क्लिनिक’ सुरु राहतील, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.

Web Title: Six 'fever clinics' in district for fever, cold, cough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.