रिठद येथे सहा घरांना आग; लाखोंचे नुकसान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 02:34 PM2019-04-08T14:34:32+5:302019-04-08T16:03:41+5:30

वाशिम - रिसोड तालुक्यातील रिठद येथे ७ एप्रिलच्या रात्रीदरम्यान सहा घरांना आग लागल्याने १५ लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.

Six houses in Rithad caught fire; losses of millions | रिठद येथे सहा घरांना आग; लाखोंचे नुकसान !

रिठद येथे सहा घरांना आग; लाखोंचे नुकसान !

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - रिसोड तालुक्यातील रिठद येथे ७ एप्रिलच्या रात्रीदरम्यान सहा घरांना आग लागल्याने १५ लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.
रिठद येथील माधव आरु यांच्या घराला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने रुद्ररूप धारण केले. या आगीत शेजारील चार ते पाच घरे जळाली. घराला आग लागल्याचे निदर्शनात येताच, घरातील सर्व मंडळी घराबाहेर पडली. त्यामुळे या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. माधव आरू यांच्या घरातील सोयाबीन, हरबºयासह ५५ हजारांची रोख जळून खाक झाली आहे. माधव आरू यांच्या शेजारी असलेले तुकाराम आरू, विश्वनाथ आरू, कुंडलिक आरू यांच्यासह अन्य एक ते दोन जणांच्या घराला आग लागली. आगीची माहिती मिळताच वाशिम नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आग विझविण्यात यश मिळविले. मात्र तोपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले. या आगीत जवळपास १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे चालक दिनकर सुरोशे, गजानन सुरोशे, विजय वानखेडे, सोनू डोंगरे, प्रशांत पाटणकर, संतोष आळणे, ऋषी कव्हर यांनी सहकार्य केले.

Web Title: Six houses in Rithad caught fire; losses of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.