फसवणूक करणा-या आरोपीस सहा महिन्यांचा कारावास

By admin | Published: December 19, 2014 01:19 AM2014-12-19T01:19:59+5:302014-12-19T01:19:59+5:30

वाशिम न्यायालयाचा निर्णय.

Six months imprisonment for cheating fraud | फसवणूक करणा-या आरोपीस सहा महिन्यांचा कारावास

फसवणूक करणा-या आरोपीस सहा महिन्यांचा कारावास

Next

वाशिम : बनावट दस्तऐवज देऊन पतसंस्थेला ठकविल्याप्रकरणी दोषी आढळून आलेल्या कर्जदारास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड येथील विद्यमान प्रथम न्यायदंडाधिकारी बी. डी. गोरे यांनी १७ डिसेंबर रोजी सुनावला. फिर्यादी विशेष वसुली अधिकारी तुळशीराम गोविंदराव निकम यांनी सदर प्रकरणी ५ मार्च २00३ रोजी फिर्याद दिली होती. निकम यांनी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वाशिम शाखेच्या कर्जवसुलीसंदर्भात आदेश पारित करुन संतोष ङ्म्रीकृष्ण नागलकर यास कर्ज भरण्यास सांगितले; मात्र त्यांनी कर्ज न भरल्यामुळे त्यांचे दुकान जप्त करण्यात आले होते. नागलकर याने दुकानाचे सील तोडून वसुलीसाठी आलेल्या वसुली अधिकर्‍यांना दिलेला दस्तऐवज बनावट व खोटे असल्याचे आढळून आल्याने आरोपी विरुद्ध भादंवि ४६७, ४६८, ४७१,५११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तपासानंतर विद्यमान प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर प्रकरणी न्यायालयाने एकूण पाच साक्षीदार तपासले. साक्षी पुराव्यामुळे आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे विद्यमान प्रथम न्यायदंडाधिकारी बी. डी. गोरे यांनी आरोपी संतोष ऊर्फ छोटू नागलकर यास कलम ४६८ व कलम ४७१ भादंविमध्ये प्रत्येकी सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी प्पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली तसेच दंड न भरल्यास पुन्हा एक महिना साधी कैेदेची शिक्षा सुनावली. सदर दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. या प्रकरणी फिर्यादी सरकारी अभियोक्ता अँड. रंजना पाटील यांच्यासह अँड. अमोल सोमाणी यांनी काम पाहीले

Web Title: Six months imprisonment for cheating fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.