आणखी सहा जणांचा मृत्यू ; ३२२ कोरोना पॉझिटिव्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:42 AM2021-04-22T04:42:03+5:302021-04-22T04:42:03+5:30
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी सहा जणांचा मृत्यू तर ३२२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २१ एप्रिल ...
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी सहा जणांचा मृत्यू तर ३२२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २१ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोना बाधितांचा आकडा २३,३७१ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांचे चिंताही वाढली आहे. बुधवारी प्राप्त अहवालानुसार आणखी सहा जणांचा मृत्यू झाला तर ३२२ जणांना कोरोना संसर्ग झाला. वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील १, सिव्हिल लाईन्स २, दत्त नगर ३, देवपेठ १, गणेश नगर १, हिंगोली रोड परिसरातील २, आययुडीपी कॉलनी ९, काळे फाईल २, कालेश्वर मंदिर परिसरातील १, क्रांती चौक येथील १, लाखाळा येथील ६, महाराणा प्रताप चौक येथील १, नवीन आययुडीपी कॉलनी येथील १, पुसद नाका येथील २, काटा रोड परिसरातील १, समता नगर येथील २, टिळक चौक येथील १, लोनसुने चौक येथील १, पंचशील नगर येथील १, सामान्य रुग्णालय परिसर १, शुक्रवार पेठ येथील २, सुंदरवाटिका येथील १, शिव चौक येथील १, नगरपरिषद परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे ७, अनसिंग येथील ४, ब्राह्मणवाडा येथील १, चिखली येथील २, कार्ली येथील ४, केकतउमरा येथील २, किनखेडा येथील १, कोंडाळा येथील २, मोतसावंगा येथील १, साखरा येथील १, सावरगाव जिरे येथील १, सोनखास येथील १, सुपखेला येथील २, तोंडगाव येथील १, वांगी येथील १, वारला येथील २, जांभरुण येथील १, मालेगाव शहरातील ४, आमखेडा येथील ४, चांडस येथील २, डही येथील १, धमधमी येथील ५, गिव्हा कुटे येथील १, करंजी येथील १, किन्हीराजा येथील १, मेडशी येथील २, राजुरा येथील १, मुठ्ठा येथील २, शिरपूर येथील ७, दापुरी येथील १, किन्ही घोडमोड येथील १, पिंपळा २, जऊळका १, रिसोड शहरातील अनंत कॉलनी येथील ३, बुलडाणा अर्बन परिसर १, सिव्हिल लाईन्स १, गजानन नगर १, गणेश नगर येथील २, कासार गल्ली येथील १, लोणी फाटा येथील ३, महानंदा कॉलनी येथील १, पोस्ट ऑफिस जवळील १, राम नगर येथील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, सदाशिव नगर येथील २, साई अनिल पार्क परिसरातील १, समर्थ नगर येथील ३, एसबीआय जवळील १, शिक्षक कॉलनी येथील १, व्यंकटेश नगर येथील १, गैबीपुरा येथील १, शिवाजी नगर येथील २, शहरातील इतर ठिकाणचे २७, आसेगाव पेन येथील १, गणेशपूर येथील १, घोन्सर येथील २, कळमगव्हाण येथील ३, करडा येथील १, केनवड येथील ५, कोयाळी येथील ३, लोणी येथील १, महागाव येथील ३, मांगूळ झनक येथील १, नेतान्सा येथील १८, निजामपूर येथील १, पळसखेड येथील १, पेडगाव येथील १, पिंप्री येथील १, रिठद येथील १, शेलू खडसे येथील १, वाकद येथील ३, नंधाना येथील १, गोवर्धन येथील १, मोरगव्हाण येथील २, लिंगा येथील १, मंगरूळपीर शहरातील अशोक नगर येथील १, सुभाष चौक येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ४, चेहल येथील ३, दस्तापूर येथील १, कवठळ येथील ४, खडी येथील २, माळशेलू येथील १, पार्डी ताड येथील १, सोनखास येथील १, तऱ्हाळा येथील १, वनोजा येथील ९, वरुड येथील ६, वसंतवाडी येथील ७, कारंजा शहरातील गुरु मंदिर जवळील १, शिक्षक कॉलनी येथील १, स्वस्तिक नगर येथील ३, बंजारा कॉलनी येथील १, भारतीपुरा येथील १, चावरे लाईन येथील १, कीर्ती नगर येथील १, सहारा कॉलनी येथील १, शिवाजी नगर येथील १, सुंदरवाटिका येथील २, इंझा येथील १, जनुना येथील २, काजळेश्वर येथील ६, मनभा येथील २, उंबर्डा बाजार येथील १, यावर्डी येथील ३, पलाना येथील १, वाघोला येथील ४, मानोरा शहरातील १, अजनी येथील २, सावरगाव येथील १, भिलडोंगर येथील १, ढोणी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १६ बाधितांची नोंद झाली असून ४८८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
००००
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह २३,३७१
ॲक्टिव्ह ३,९५५
डिस्चार्ज १९,१७१
मृत्यू २४४