आणखी सहा जणांचा मृत्यू; ५८८ कोरोना पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:40 AM2021-05-14T04:40:53+5:302021-05-14T04:40:53+5:30
गुरुवारी प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे कारंजा तालुक्यात आढळून आले आहेत. वाढीव कोरोना चाचण्यांच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोना बाधितांची ...
गुरुवारी प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे कारंजा तालुक्यात आढळून आले आहेत. वाढीव कोरोना चाचण्यांच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या स्थिर असली तरी कोरोनाचा आलेख खाली येत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे मृत्यूसत्रही कायम असल्याने भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यात आणखी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद गुरुवारी घेण्यात आली. एकूण ५८८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम १०७, मालेगाव तालुक्यातील ८३, रिसोड तालुक्यातील ५१, मंगरुळपीर तालुक्यातील ८७, कारंजा तालुक्यातील ११७ आणि मानोरा तालुक्यात १०८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ३५ बाधितांची नोंद झाली असून, ५८२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
०००००००००००
रिसोड तालुक्यात कमी तर कारंजात सर्वाधिक रुग्ण आढळले
दरदिवशी सहा तालुक्यातील रुग्णसंख्येत चढउतार दिसून येत आहेत. गुरुवारच्या अहवालानुसार सर्वात कमी रुग्ण रिसोड तालुक्यात (५१) आढळून आले तर सर्वात जास्त रुग्ण कारंजा तालुक्यात (११७) आढळून आले. मानोरा तालुक्यातील रुग्णसंख्येतही चढ-उतार आहेत. कधी कमी संख्येने तर कधी अधिक संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांनी दक्षता बाळगणे आवश्यक ठरत आहे.
००००
५८२ जणांची कोरोनावर मात
गुरुवारच्या अहवालानुसार नव्याने ५८८ रुग्ण आढळून आले तर तब्बल ५८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल व खासगी कोविड हॉस्पिटल येथे जवळपास ९५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर उर्वरित जवळपास ३३६५ रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत.
000000000000
एकूण पॉझिटिव्ह : ३४०२९
ऍक्टिव्ह : ४३१७
डिस्चार्ज : २९३५७
मृत्यू : ३५४
०००००