आणखी सहा जणांचा मृत्यू, ४७२ कोरोना पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:43 AM2021-05-11T04:43:31+5:302021-05-11T04:43:31+5:30
वाढीव कोरोना चाचण्यांच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या स्थिर असली तरी, कोरोनाचा आलेख खाली येत नसल्याने चिंता व्यक्त केली जात ...
वाढीव कोरोना चाचण्यांच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या स्थिर असली तरी, कोरोनाचा आलेख खाली येत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच वाशिम शहरासह तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोमवारीदेखील वाशिम तालुक्यात १७६ जण कोरोनाबाधित आढळून आले. जिल्ह्यात आणखी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद सोमवारी घेण्यात आली. एकूण ४७२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम १७६, मालेगाव तालुक्यातील ६०, रिसोड तालुक्यातील ४५, मंगरुळपीर तालुक्यातील २६, कारंजा तालुक्यातील ५१ आणि मानोरा तालुक्यात ८० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ३४ बाधितांची नोंद झाली असून, ४२८ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
०००००००००००
मानोरा तालुक्यातही रुग्णसंख्या वाढतेय
जिल्ह्यात सर्वात कमी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. आतापर्यंत मानोरा तालु्क्यात रुग्णसंख्या कमी होती. गत तीन,चार मानोरा तालुक्यातही रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येते. दिवसात ६ मे रोजी ११, ७ मे रोजी ४०, ८ मे रोजी ८७, ९ मे रोजी १८, १० मे रोजी ८० रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना गृहविलगीकरणासाठी फारशा सुविधा उपलब्ध नसतानादेखील कोणतीही खातरजमा न करता गृहविलगीकरणात ठेवण्यात येत आहे.
००
एकूण पॉझिटिव्ह ३२,५४६
ॲक्टिव्ह ४,५३४
डिस्चार्ज २७,६७१
मृत्यू ३४०