तलाठ्यांची सहा पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:37 AM2021-05-22T04:37:13+5:302021-05-22T04:37:13+5:30
वाशिम : तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावात तलाठ्यांची उणीव भासत आहे. तालुक्यात तलाठ्यांची सहा पदे रिक्त असल्याने कामांचा खोळंबा होत ...
वाशिम : तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावात तलाठ्यांची उणीव भासत आहे. तालुक्यात तलाठ्यांची सहा पदे रिक्त असल्याने कामांचा खोळंबा होत असून ग्रामस्थांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
0000000000000
पशू दवाखाना इमारतींची दुरवस्था
कारंजा लाड : पशुसंवर्धन विभागांतर्गत जिल्हाभरातील आठ ठिकाणच्या पशू दवाखाना इमारतींची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे पशुपालकांसह कार्यरत कर्मचाऱ्यांना उपचार कार्यात अडचण निर्माण झाली आहे.
0000000000000
जि.प.मध्ये नो-पार्किग नियमाचे उल्लंघन
वाशिम: येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालय परिसरात वाहने उभी करण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे; परंतु या ठिकाणी नागरिक नियमांचे उल्लंघन करून वाटेल तेथे वाहने उभी करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
00000000000000000
बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी
वाशिम : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाकडून कोरोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची तत्काळ कोरोना चाचणी केली जात आहे. गावोगावी ही मोहीम सुरू आहे.
00000000000000
आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन
जऊळका रेल्वे : मालेगाव तालुक्यात वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता आरोग्य विभागाने गावागावात मार्गदर्शन सुरू केले आहे. त्यानुसार, गुरुवारी आरोग्य विभागाच्या पथकाने परिसरातील गावांमध्ये ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
000000000000
कनेक्टिव्हिटीअभावी धनजवासी त्रस्त
वाशिम : ग्रामीण भागात विविध मोबाइल कंपन्याचे टाॅवर असतानादेखील योग्य प्रमाणात नेटवर्क मिळत नसल्याने मोबाइलधारक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे विशेषत: बँकांचे व्यवहार प्रभावित होत आहेत. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
0000000000000
विलगीकरणातील व्यक्तींना ताकीद
कामरगाव: गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर आदेश जारी केले असून, शुक्रवारी बाधितांना घराबाहेर न पडण्याची ताकीद देण्यात आली.
0000000000
वाशिम तालुक्यातील रोहित्र दुरुस्त
वाशिम : तालुक्यात कृषिपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रात बिघाड झाल्याने शेतकऱ्यांना सिंचनात अडचणी येत होत्या. त्याची महावितरणने दखल घेत रोहित्रांची दुरुस्ती केल्याचे कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी सांगितले.
0000000000000
ग्रामस्थांची कोरोना चाचणी
वाशिम: तालुक्यातील ग्रामीण भागांत आरोग्य विभागाने कोरोना चाचणीला वेग दिला आहे. शुक्रवारी जांभरूण, अनसिंग, कोंडाळा महाली येथील काही ग्रामस्थांची आरोग्य विभागाकडून कोरोना चाचणी करण्यात आली.
0000000000000
नाले सफाई खोळंबली; आरोग्य धोक्यात
कारंजा : कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागात नाल्यांची सफाई करण्याबाबत ग्रामपंचायतींनी उदासीनतेचे धोरण अंगीकारले आहे. नाल्यांची सफाई होत नसल्याने तुंबलेले सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसून येत आहे.
00000000000000
शेलूबाजार येथे लसीकरण शिबिर
वाशिम : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले. या माध्यमातून शेलुबाजारसह परिसरातील इतरही गावांमधील नागरिकांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला.
000000000000
वाशिम-केकतउमरा रस्त्याची दुर्दशा
वाशिम : वाशिम येथून केकतउमरा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यापूर्वी रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
००००००००००००००
फळविक्रेत्यांना दिलासा
वाशिम : कडक निर्बंधातून काहीअंशी सूट मिळत सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा मिळाल्याने अडचणीत सापडलेल्या फळविक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.