वाशिम तालुक्यात सहा शाळा शंभर नंबरी

By admin | Published: June 17, 2014 09:36 PM2014-06-17T21:36:11+5:302014-06-17T23:48:23+5:30

वाशिम तालुक्यातील एकुण ४४८६ विद्यार्थ्यांपैकी ३९४५ विद्यार्थी उर्त्तीर्ण झाले.

Six schools in Washim taluka number one hundred | वाशिम तालुक्यात सहा शाळा शंभर नंबरी

वाशिम तालुक्यात सहा शाळा शंभर नंबरी

Next

वाशिम : मार्च महिण्यात घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल आज १७ जुन रोजी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. या निकालामध्ये वाशिम तालुक्यातील एकुण ४४८६ विद्यार्थ्यांपैकी ३९४५ विद्यार्थी उर्त्तीर्ण झाले. तालुक्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८८.३३ टक्के एवढी असुन तालुक्यातील सहा शाळांनी आपली १00 टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली. हे उल्लेखनीय.
वाशिम तालुक्यातील १00 टक्के निकाल देणार्‍या शाळांमध्ये श्रीमती मुलीबाई चरखा इंग्लीश स्कुल वाशिम, यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा सुपखेला, शांतीनिकेतन इंग्लीश स्कुल वाशिम, माऊंट कारमेल इंग्लीश स्कुल वाशिम, म. आझाद उदरु हायस्कुल वाशिम व हॅपी फेसेस कॉन्व्हेंट स्कुल वाशिम या सहा शाळांचा समावेश आहे.
तालुक्यातील ईतर शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. बाकलीवाल विद्यालय वाशिम ९0.४७ टक्के, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा वाशिम ९४.२८ टक्के, नगर परिषद महात्मा गांधी विद्यालय वाशिम ६0.४८ टक्के, श्री शिवाजी हायस्कुल वाशिम ७९.२८ टक्के, जिल्हा परिषद हायस्कुल वाशिम ४१.८६ टक्के, रेखाताई राष्ट्रीय कन्या विद्यालय वाशिम ८२.७८ टक्के, परमवीर अब्दुल हमीद उदरु विद्यालय वाशिम ८८.४६ टक्के, राधादेवी बाकलीवाल कन्या विद्यानिकेतन वाशिम ८२.९७ टक्के, लक्ष्मीनारायण ईन्नानी हायस्कुल वाशिम ६0 टक्के, मालतीबाई सरनाईक कन्या विद्यालय वाशिम ९४.0१ टक्के, पी.डी. जैन विद्यालय अनसिंग ७५ टक्के, जीजामाता विद्यामंदीर अनसिंग ६४ टक्के, मौलाना आझाद उदरु हायस्कुल अनसिंग ९७.५0 टक्के, श्रीकृष्ण विद्यालय तोंडगाव ८९.६१ टक्के, श्री हनुमान विद्यालय उकळी पेन ९४.५२ टक्के, श्री राजेश्‍वर विद्यालय वांगी ९0.३५ टक्के, विठाबाई पसारकर विद्यामंदीर केकतउमरा ९६.७0 टक्के, नागसेन विद्यालय अडोळी ७८.५७ टक्के, स्वामी विवेकानंद विद्यालय कोकलगाव ८८.११ टक्के, श्री पारेश्‍वर विद्यालय पार्डी टकमोर ९३.७९ टक्के, श्री विठ्ठल विद्यालय पार्डी आसरा ९१.१३ टक्के, संत ज्ञानेश्‍वर टेक्नीकल विद्यालय कळंबा महाली ९४.११ टक्के, यशवंतराव चव्हाण विद्यालय काजळंबा ९७.११ टक्के, स्व. काशिरामजी चौधरी विद्यालय माळेगाव भटउमरा ९८.११ टक्के, श्री लाल बहाद्दुर शास्त्री विद्यालय काटा ९७.२७ टक्के, डॉ. पंजाबराव देशमुख विद्यालय तांदळी हिवरा ७८.८४ टक्के, शिंदे गुरूजी विद्यामंदीर वारला ९७.२७ टक्के, ओंकारेश्‍वर विद्यालय जयपुर ९३.३३ टक्के, विदर्भ विद्यालय पिंपळगाव ९७.६१ टक्के एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
श्रीराम चरणदासबाबा विद्यालय फाळेगाव ९६.५१ टक्के, स्व. नामदेवराव राजगुरू विद्यालय धुमका बोराळा ८७.८0 टक्के, संस्कार सदन विद्यामंदीर अनसिंग ८२.१४ टक्के, श्री गजानन महाराज विद्यालय सावरगाव जीरे ८९.0९ टक्के, ज्ञानराज माऊली विद्यालय तोरणाळा जोडगव्हाण ९५.२३ टक्के, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय राजगाव ८८.८८ टक्के, श्री गजानन महाराज विद्यालय बाभुळगाव ९६.८७ टक्के, हाजी बद्रृद्दीन बेनीवाल उदरु हायस्कुल वाशिम ९७.६७ टक्के, श्री शरद पवार माध्यमिक विद्यालय सुपखेला ९५.७४ टक्के, श्री विठ्ठल विद्यालय तामसी ९0.६९ टक्के, राजमाता जिजाऊ विद्यामंदीर तामसी ९६.१५ टक्के, श्री बिरूजी पाटील मस्के विद्यामंदीर वाई ९८.३६ टक्के, श्री काशिरामजी पाटील विद्यामंदी सुपखेला ९७.९१ टक्के, जागेश्‍वर विद्यालय कार्ली ९६.0६ टक्के, श्री रघुनाथ स्वामी विद्यालय सोयता ९४.२३ टक्के, विवेकानंद विद्यालय वारा जहाँगिर ९६.७७ टक्के, सौ. सुशिलाबाई जाधव विद्यानिकेतन लाखाळा वाशिम ९१.९३ टक्के, श्री राजीव गांधी विद्यालय वाशिम ६८.४२ टक्के, गौरिशंकर माध्यमिक विद्यालय वाशिम ८५.७१ टक्के, श्री ज्ञानेश्‍वर माऊली विद्यालय कोंडाळा ९६.९६ टक्के, लायन्स विद्या निकेतन माध्यमिक विद्यालय वाशिम ९८.११ टक्के, नालंदा आश्रम शाळा अडोळी ५२.३0 टक्के, श्री मैनागिरी महाराज विद्यालय टो जुमडा ९0 टक्के, स्व. हौसाजी काटेकर विद्यालय एकांबा ४४.४४ टक्के, संत ज्ञानेश्‍वर विद्यालय आसोला ९0.२४ टक्के एवढी विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Web Title: Six schools in Washim taluka number one hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.