शेतीच्या बांधबदिस्ताची कामे धिम्यागतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:31 AM2021-06-01T04:31:04+5:302021-06-01T04:31:04+5:30
पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब हा शेतात थांबावा व त्यासोबत वाहून जाणारी मातीही थांबावी, या हेतूने नानासाहेब कृषी संजीवनी योजनेत ...
पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब हा शेतात थांबावा व त्यासोबत वाहून जाणारी मातीही थांबावी, या हेतूने नानासाहेब कृषी संजीवनी योजनेत तालुक्यातील २४ गावांची निवड करण्यात आली. यामध्ये शेलू बु. मांडवा, देवचंडी, वढवी, इसफपूर, सोहळ, वाई, गायवळ, लोहारा आदी गावांत ढाळीच्या बांध करण्याची मान्यता ही १८ मार्च २०२० रोजी दिली असताना मागील वर्षापासून ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र कृषी विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे ठेकेदार आपल्या मनमानीप्रमाणे, सोयीनुसार कामे करीत आहे. त्यात शेतकऱ्यांच्या येणाऱ्या अडचणी याकरिता कृषी सहायक यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या सोडवली, तर काम करणा-या जेसीबीचालकांनासुध्दा सहकार्य होऊन कामे त्वरित पूर्ण होतात. तसेच कामाची गुणवत्तासुध्दा सुधारावी व पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करा, अशी मागणी निवड झालेल्या गावातून व्यक्त होत आहे.
...................
शेतांच्या बांधाची कामे पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते; मात्र ती पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे उर्वरित कामे पुढीलवर्षी करण्यात येतील.
संतोष वाळके,
तालुका कृषी अधिकारी