बाजारपेठेवर मंदीचे सावट!
By admin | Published: November 18, 2016 02:32 AM2016-11-18T02:32:35+5:302016-11-18T02:32:35+5:30
बँकांसमोरील नागरिकांच्या रांगा कायमच; शेतक-यांची गैरसोय
वाशिम, दि. १७- ५00 व १000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर पुरेशा प्रमाणात चलनातील नोटा उपलब्ध नसल्याचा जबर फटका बाजारपेठांना बसला आहे. विविध वस्तूंचे खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प असल्याने दुकान मालकांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे.
काळ्या पैशाला लगाम घालणे, बनावट नोटांचे वाढलेले प्रस्थ आणि दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाणारा पैसा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५00 व १000 रुपयांची नोट रद्दबातल ठरविण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून चलनातून बाद ठरलेल्या नोटा बदलविण्यासाठी नागरिकांच्या रांगा बँकांसमोर लागत आहेत.
चलनातील नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने तुटवडा निर्माण होत आहे. ह्यएटीएमह्णमधून एका वेळी केवळ दोन हजार रुपये मिळत आहेत. पुरेशा पैशाअभावी ह्यएटीएमह्ण सेवादेखील काही कालावधीसाठीच सुरू राहते. बँकेतून विड्रॉल घेताना १00 रुपये, दोन हजार रुपयांच्या नोटा दिल्या जातात. दोन हजार रुपयांची चिल्लर देताना १00 रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवत आहे. त्याचा फटका व्यापार्यांना सर्वात मोठय़ा प्रमाणात बसत आहे. वाशिम येथील पाटणी चौकस्थित बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी ओसरल्याचे दिसून येते. गत आठवड्यापासून ग्राहकांची प्रतीक्षा असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. पूर्वीच्या तुलनेत बाजारपेठेतील उलाढालीत आता ५0 टक्क्यांपेक्षाही अधिक घट झाल्याचा दावा व्यापार्यांनी केला आहे. बँकेतून पैसे विड्रॉल करण्यावर र्मयादा असल्याने ठोक वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. ठोक वस्तूंच्या व्यावसायिकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समित्या पूर्ववत झाल्या असल्या; तरी येथे शेतमाल आणण्यासाठी शेतकरी येत नसल्याचे दिसून येते. शेतकर्यांनी पाठ फिरविल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट असल्याचे गुरुवारी पाहावयास मिळाले. चित्रपटगृहांमध्येदेखील प्रेक्षकवर्ग फिरकत नसल्याने चित्रपटगृह बंद ठेवण्याची वेळ संचालकांवर आली आहे. पुरेशा प्रमाणात चलनातील नोटा उपलब्ध नसल्याने वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा येथील बाजारपेठेवरही मंदीचे सावट असल्याचे दिसून येते. बँकांसमोरील गर्दी अद्यापही कायम असल्याचे दिसून येते.