राष्ट्रीयकृत बँकेच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:47 AM2021-07-14T04:47:02+5:302021-07-14T04:47:02+5:30
*कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करून पात्र शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याची मागणी मानोरा- तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी दत्तक घेतलेल्या गावातील ...
*कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करून पात्र शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याची मागणी
मानोरा- तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी दत्तक घेतलेल्या गावातील असंख्य शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मानोरामध्ये महत्त्वाच्या अधिकारी, कर्मचारी यांची इतरत्र बदली झाल्याने कामधंदे सोडून शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येरझारा घालाव्या लागत असल्याची तक्रार माजी सैनिक व शेतकरी असलेल्या नागरिकांनी वरिष्ठांकडे केली आहे.
मानोरा शहरामध्ये मोजक्या बँक असून स्टेट बँक ऑफ इंडिया ही केवळ एक राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेतील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांची बदली झालेली आहे. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ दुसऱ्या जागी पाठविण्यात आले. या रिक्त झालेल्या जागांवरती अधिकारी-कर्मचारी रूजू झालेले नसल्याचे कारण देऊन मागील आठ दिवसांपासून असंख्य गरजू व पात्र शेतकऱ्यांना मानोरा एसबीआय शाखेमध्ये शेतीची कामधंदे सोडून पायऱ्या झिजवाव्या, लागत असल्याचा आरोप वाटोद आणि धानोरा शिवारामध्ये शेत असलेले माजी सैनिक रशीद खान हमीद खान पठाण यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केला आहे.