दुकाने बंदमुळे लघुव्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:39 AM2021-03-08T04:39:20+5:302021-03-08T04:39:20+5:30

.............. वाहनांअभावी प्रवाशांची गैरसोय वाशिम : जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून रविवारी दिवसभर जिल्ह्यात कडेकोट बंद पाळण्यात आला. यामुळे ग्रामीण भागातील ...

Small businesses stalled due to closure of shops | दुकाने बंदमुळे लघुव्यवसाय ठप्प

दुकाने बंदमुळे लघुव्यवसाय ठप्प

Next

..............

वाहनांअभावी प्रवाशांची गैरसोय

वाशिम : जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून रविवारी दिवसभर जिल्ह्यात कडेकोट बंद पाळण्यात आला. यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक घराबाहेरच पडले नाहीत. परिणामी, वाहनेही उपलब्ध नव्हती. यामुळे महत्त्वाच्या कामानिमित्त शहरात यावे लागलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली.

.................

रेती वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

वाशिम : चोरट्या मार्गाने शहरात येणाऱ्या रेतीची राजरोस वाहतूक सुरू असताना प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे महसूल बुडत असून तहसीलदारांनी धडक कारवाईची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी अनिकेत गाठे यांनी शुक्रवारी निवेदनाव्दारे केली.

...............

स्वतंत्र कार्यालय नसल्याने गैरसोय

वाशिम : कृषी विभागातील महत्त्वाचे पद असलेल्या तालुका अधिकाऱ्यांना स्वतंत्र कार्यालय नाही. जिल्ह्यातील बहुतांश तालुका कृषी अधिकारी कार्यालयांचा कारभार हा भाड्याच्या इमारतीत सुरू असून आवश्यक सुविधा नसल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे.

.............

खाद्यान्न सुरक्षा जनजागृतीस ‘खो’

जऊळका रेल्वे : नागरिकांच्या आरोग्याशी निगडित खाद्यान्न सुरक्षेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. प्रशासकीय पातळीवरून यासंबधी कुठलीच जनजागृती होताना दिसत नाही. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठकदेखील दरमहा होत नसल्याचे दिसत आहे.

......................

अतिक्रमणाने गायरान जमीन धोक्यात

मेडशी : परिसरातील बहुतांश गावांमध्ये शेकडो हेक्टर गायरान वनजमीन होती; मात्र वाढते अतिक्रमण व जंगलतोडीमुळे वनजमिनीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी शे. रऊफ यांनी शुक्रवारी केली.

...............

मालेगाव बसस्थानकात सुविधांचा अभाव

मालेगाव : येथील तहसील कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या बसस्थानकात विविध समस्या उद्भवल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी या बसस्थानक परिसरात सुविधा उपलब्ध करण्याची मागणी सुरेश कोकाटे यांनी आगारप्रमुखांकडे निवेदनाव्दारे केली.

.......................

एटीएम बंदमुळे नागरिक त्रस्त

वाशिम : शहर परिसरातील एटीएम अधिकांश वेळा बंद राहणे, त्यात पैसे नसणे, आदी समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवारीदेखील असाच अनुभव अनेक नागरिकांना आला. या गंभीर बाबीकडे बँकांनी लक्ष पुरवून ग्राहकांच्या अडचणी दूर कराव्या, अशी मागणी होत आहे.

......................

गतिरोधकांचा अभाव

वाशिम : शहरातून जाणाऱ्या नांदेड-अकोला राष्ट्रीय महामार्गावर अकोला नाका आणि शहर पोलिस स्टेशननजीक आयआरसीच्या (इंडियन रोड काँग्रेस) निकषानुसार गतिरोधक उभारणे आवश्यक आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी माधव डोंगरदिवे यांनी महामार्ग प्राधिकरणाकडे केली.

.......................

वाहनांतून प्रदूषण; कारवाईची मागणी

किन्हीराजा : बहुतांश जीप, ऑटो, दुचाकी वाहने जुनी झाली असून प्रदूषण होत आहे. संबंधित यंत्रणेने त्यावर निर्बंध लादून प्रदूषणाची समस्या दुर करावी, अशी मागणी प्रवीण गोटे यांनी शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली.

.................

आययूडीपीमधील नाल्यांची सफाई करा

वाशिम : शहरातील जुनी आययूडीपी कॉलनी परिसरात घाण पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची दैनंदिन सफाई होत नसल्याने त्यातून दुर्गंधी पसरत आहे. याकडे नगर परिषदेने लक्ष पुरवून नाल्यांची सफाई करण्याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी विशाल राऊत यांनी नगर परिषदेकडे निवेदनाव्दारे केली.

.................

ग्रामीण भागात ग्रामसेवकांचे अपडाऊन

वाशिम : ग्रामीण भागात कार्यरत असलेले बहुतांश ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने गावपातळीवरील कामांचा खोळंबा होत आहे. ग्रामसेवकांना मुख्यालयी थांबण्याबाबत निर्देशित करण्याची मागणी गौतम गायकवाड यांनी जिल्हा परिषदेकडे केली.

...................

कोंडवाड्याची दुरुस्ती करण्याची मागणी

शिरपूर जैन : येथील बसस्थानकाला लागून असलेल्या गुरांच्या कोंडवाड्याची दुरवस्था झाली असून त्यात गुरे कोंडली जात नाहीत. तथापि, गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या कोंडवाड्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ५ मार्च रोजी ग्रामपंचायतकडे केली.

Web Title: Small businesses stalled due to closure of shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.