बेफिकीर नागरिकांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:39 AM2021-03-24T04:39:22+5:302021-03-24T04:39:22+5:30
लॉकडाऊन काळात जिल्हा पोलीस दलाने ज्येष्ठ नागरिकांना विनाविलंब मदत पोहोचविण्यासाठी ‘हेल्प लाइन’ सुरू केली. पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार यांना ...
लॉकडाऊन काळात जिल्हा पोलीस दलाने ज्येष्ठ नागरिकांना विनाविलंब मदत पोहोचविण्यासाठी ‘हेल्प लाइन’ सुरू केली. पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार यांना मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड, हॅण्डग्लोज, थर्मल गन, हॅण्डवॉश, ऑक्सिमीटर, कॉटन दुपट्टा देण्यासह रोगप्रतिकारशक्ती वाढावी, याकरिता होमियोपॅथिक, अॅलोपॅथिक, आयुर्वेदिक गोळ्यांचे वितरण करण्यात आले. लॉकडाऊन काळात लावण्यात आलेल्या संचारबंदीदरम्यान पोलिसांनी काही मोठे गुन्हेदेखील उघडकीस आणले. संचारबंदीचे उल्लंघन करणा-यांविरोधात धडक कारवाईचे सत्र अवलंबून यासंबंधीचे २९०५ गुन्हे दाखल करण्यात आले. याच काळात ९०० वाहने जप्त करण्यात आली. विनापरवानगी जिल्ह्याची सीमा ओलांडणा-या २४३ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. दारूबंदी कायद्यांतर्गत १६७९ गुन्हे दाखल करून ६६ लाख १९ हजार ८८६ रुपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यांतर्गत ६५५ गुन्हे दाखल करून २२ लाख ५९ हजार ३५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. लॉकडाऊन असताना नियमांचे उल्लंघन करून मास्क न लावणा-या २८ हजार २३३ जणांकडून ६१ लाख ४५ हजार २०० रुपयांचा दंड याच काळात वसूल करण्यात आला.