नियम तोडणाऱ्यांच्या आवळणार मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:42 AM2021-05-09T04:42:28+5:302021-05-09T04:42:28+5:30
................ घरीच उपचार घेण्यावर भर वाशिम : कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतरही अनेकजण घरीच उपचार घेण्यावर भर देत आहेत. अशा ...
................
घरीच उपचार घेण्यावर भर
वाशिम : कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतरही अनेकजण घरीच उपचार घेण्यावर भर देत आहेत. अशा लोकांनी मात्र स्वत:सोबतच इतरांचीही काळजी घ्यावी. बाहेर पडू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.
.................
डासांचा प्रादुर्भाव; पालिकेचे दुर्लक्ष
वाशिम : शहरातील विविध भागात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून, नगरपालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आकाश चहारे यांनी शुक्रवारी केली.
..................
सॅनिटायझर विक्रीत पुन्हा वाढ
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट गंभीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर औषध विक्रीच्या दुकानांमधून सॅनिटायझरची विक्रीदेखील वाढल्याचे दिसून येत आहे.
..............
कुपनलिकांची पाणीपातळी खालावली
वाशिम : शहर व परिसरातील कुपनलिकांची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. काही ठिकाणच्या कुपनलिका पूर्णत: कोरड्या पडल्याने पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
....................
बंदोबस्तावरील पोलिसांचा खडा पहारा
उंबर्डा बाजार : वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता, लाॅकडाऊन लावण्यात आले असून, नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे. त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावला असून, कर्मचारी खडा पहारा देत आहेत.
....................
समृद्ध गाव स्पर्धेची कामे थांबली
जऊळका रेल्वे : परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत सहभागी असलेल्या गावांमध्ये खबरदारी म्हणून या स्पर्धेची कामे थांबविण्यात आली आहेत.
....................
जामदरा तलावाच्या दुरुस्तीची प्रतीक्षा
इंझोरी : परिसरातील जामदरा तलावाच्या भिंतीत ‘लिकेज’ असल्याने दरवर्षी हा तलाव कोरडा पडतो. यंदाही या समस्येमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या तलावाची दुरुस्ती प्रस्तावित असली, तरी अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही.
....................
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
मेडशी : परिसरात कोरोना संसर्ग वाढत असताना मेडशीत काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन केले जात आहे. दरम्यान, नागरिक व व्यावसायिकांनी ही बाब गंभीरपणे घेत नियमांचे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले.
....................
शिरपूर येथे कोरोना चाचणी
शिरपूर जैन : गेल्या काही दिवसात अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्याची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने गावातील ज्येष्ठ व दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींची कोरोना चाचणी सुरू केली आहे.
....................
पथकाकडून प्रतिष्ठानांची तपासणी
वाशिम : मास्क न लावणाऱ्या व्यावसायिक प्रतिष्ठानांमधील लोकांवर कारवाईचे अधिकार पालिकेला देण्यात आले आहेत. त्यानुसार वाशिम नगरपालिकेच्या पथकाने शुक्रवारी बाजारात फेरी मारून व्यावसायिक प्रतिष्ठानांची तपासणी केली.
....................
‘कन्टेनमेंट झोन’ची अंमलबजावणी
वाशिम : तालुक्यातील काही गावांमध्ये दरदिवशी कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना दक्षतेच्या सूचना दिल्या असून, बाधितांचा परिसर ‘कन्टेनमेंट झोन’ जाहीर करण्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.