जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरळीत; दुसरी लाट ओसरल्यानंतर आली गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:28 AM2021-07-10T04:28:15+5:302021-07-10T04:28:15+5:30
वाशिम जिल्ह्यात सद्यस्थितीत खासगी रुग्णालये वगळता शासकीय रुग्णालयांपैकी केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया वगळता सर्वचप्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात ...
वाशिम जिल्ह्यात सद्यस्थितीत खासगी रुग्णालये वगळता शासकीय रुग्णालयांपैकी केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया वगळता सर्वचप्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र सुविधा आणि वेगळे कक्ष असल्याने सर्वसाधारण गंभीर आजारांवरील शस्त्रक्रियांमध्ये खंड पडला नाही. उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया कक्षाचे काम सुरू असल्याने येथील शस्त्रक्रिया बंद आहेत. तथापि, कोरोना संसर्गाचा कहर सुरू असल्याने प्रवासातील गर्दीसह रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमुळे कोरोना संसर्गाची भीती अनेकांच्या मनात होती. त्यामुळे काही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी प्रतीक्षा करणेच पसंत केले.
-----------
बॉक्स : कोणत्या रुग्णालयात कोणत्या शस्त्रक्रिया सुरू
१) जिल्हा रुग्णालय : वाशिम जिल्हा रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया वगळता जवळपास सर्वच साधारण शस्त्रक्रिया केल्या जातात.
२) उपजिल्हा रुग्णालय : कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरचे काही काम रखडल्याने या ठिकाणी शस्त्रक्रिया बंद आहेत.
३) ग्रामीण रुग्णालय : जिल्ह्यातील सहा ग्रामीण रुग्णालयांत सद्यस्थितीत महिलांच्या सिझेरिअनच्या शस्त्रक्रिया सुरू आहेत.
--------
बॉक्स : कोरोना नियंत्रणामुळे मिळाला दिलासा
१) गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला कोरोना संसर्गाचा कहर कमी झाला आहे. त्यामुळे आमच्या नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया करण्यास मोठा आधार झाला.
- नंदाबाई खडसे
-------
२) कोरोना संसर्ग काळातही जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. शिवाय स्वतंत्र व्यवस्था असल्याने भीतीही नव्हती; परंतु प्रवासाच्या अडचणी असल्याने प्रतीक्षा करणेच योग्य वाटले.
- अशोक गारडे
-------------
ओपीडी निरंतर सुरूच
१) जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडी कक्ष कधीच बंद ठेवण्यात आला नाही
२) कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही ओपीडी सुरूच होती.
३) कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर ओपीडीला प्रतिसाद वाढला आहे.
------------
जिल्हा शल्यचिकित्सकांचा कोट
कोट : जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्ष नियमित सुरूच असून, या ठिकाणी गरोदर महिलांचे सिझेरिअन, पोटाच्या शस्त्रक्रियांसह इतर सर्वच साधारण शस्त्रक्रिया सुरूच आहेत. केवळ नेत्र शस्त्रक्रिया काही दिवसांपासून बंद पडलेली आहे.
- डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम
--------------
गरिबांवर कोरोनाशिवाय इतर उपचार झाले कोठे
१) जिल्ह्यात कोरोना संसर्गाची पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही जिल्हा रुग्णालयात ओपीडी आणि ओटी कक्ष सुरूच होते.
२) उपजिल्हा रुग्णालयातही कोरोनासह इतरही आजारांवर उपचार सुरू होते. त्याचा फायदा गरिबांना झाला.
३) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यानही ग्रामीण भागातील लोकांना शासकीय रुग्णालयाचा इतर आजारांसाठी फायदा झाला.
.
बॉक्स :
-शासकीय रुग्णालयात सध्या कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू -०९
-शासकीय रुग्णालयात सध्या रिकामे असलेले बेड्स -२३९