सात महिन्यात २९0 जणांना सर्पदंश !
By admin | Published: August 19, 2015 01:45 AM2015-08-19T01:45:42+5:302015-08-19T01:45:42+5:30
नागपंचमी दिन विशेष ; सर्पमित्रांनी दिले ५0 सापांना जीवनदान.
वाशिम : जानेवारी ते जुलै २0१५ या ७ महिन्याच्या कालावधीत वाशिम जिल्हय़ात २९0 जणांना सर्पदंश झाल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दप्तरी आहे. शेतकर्यांचा मित्र तथा निसर्गाच्या साखळीमधील एक महत्त्वाचा घटक म्हणून सापाकडे पाहिल्या जाते. भारतीय परंपरेत सापांना महत्त्व दिल्या गेले आहे. त्या अनुषंगानेच नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीच्या पूर्वसंध्येला सर्पदंश, सापाला जीवनदान, सापाबाबतचे गैरसमज आदींचा आढावा घेतला असता, अनेक पैलू समोर आले. वाशिम जिल्हय़ात कोब्रा, घोणस व मण्यार असे तीन प्रकारचे विषारी साप आढळून आले आहेत. सापाच्या बिनविषारी, निमविषारी आणि विषारी अशा जाती असून, भारतात प्रामुख्याने ५२ प्रकारच्या सापांच्या जाती या विषारी आहेत. वाशिम परिसरात सर्पमित्रांनी गेल्या वर्षभरात जवळपास ५0 सापांना जीवनदान दिले आहे, अशी माहिती सर्पमित्र दिवाकर कौंडिण्य यांनी दिली. भारतात प्रामुख्याने २७८ सापांच्या जाती आढळत असल्या तरी त्यातील ५२ प्रकारच्या जाती या विषारी गटात मोडतात.