मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्यांना वनविभागाची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 02:23 PM2018-03-22T14:23:17+5:302018-03-22T14:23:17+5:30

कारंजा लाड - दुतोंड्या (मांडूळ) जातीच्या सापांना पकडून त्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यां दोघांना २१ मार्च रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास  कारंजा ते दारव्हा मार्गावरील १३२ केव्ही वीज केंद्राजवळ कारंजा शहर पोलिसांनी ताब्यात घेत वनविभाच्या हवाली केले.

snake smuggler in custody of forest police | मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्यांना वनविभागाची कोठडी

मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्यांना वनविभागाची कोठडी

Next
ठळक मुद्दे वीज केंद्राजवळ एक संशयीत सकाळी ३.३० वाजताच्या दरम्यान कारंजा शहर पोलिसांना आढळून आला. अधिक चौकशी केली असता, त्याचेकडे एक मांडूळ जातीचा साप असल्याचे निष्पन्न झाले. शेख अहेमद अब्दुल जब्बार (३५) रा. दाईपूरा कारंजा व शेख जावेद शेख अहमद (३५)  रा. मंगळवारा कारंजा अशी आरोपींची नावे

कारंजा लाड - दुतोंड्या (मांडूळ) जातीच्या सापांना पकडून त्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यां दोघांना २१ मार्च रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास  कारंजा ते दारव्हा मार्गावरील १३२ केव्ही वीज केंद्राजवळ कारंजा शहर पोलिसांनी ताब्यात घेत वनविभाच्या हवाली केले. या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शनिवारपर्यंत वनविभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

कारंजा शहर पोलीस शहरात २१ मार्च रोजी रात्री दरम्यान गस्त सुरू असताना वीज केंद्राजवळ एक संशयीत सकाळी ३.३० वाजताच्या दरम्यान कारंजा शहर पोलिसांना आढळून आला. अधिक चौकशी केली असता, त्याचेकडे एक मांडूळ जातीचा साप असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेवून चैकशी केली असता, तपासात आणखी दुसºया व्यक्तीकडेही एक साप असल्याचे निष्पण्ण झाले. त्या दोघांनाही कारंजा शहर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. दरम्यान, शेख अहेमद अब्दुल जब्बार (३५) रा. दाईपूरा कारंजा व शेख जावेद शेख अहमद (३५)  रा. मंगळवारा कारंजा अशी आरोपींची नावे असून, त्यांच्यावर वन्य जीव अधीनियम १९७२ नुसार कारवाई करण्यात आली. यावेळी अडीच किलो वजनाचा एक व एक किलो ७००  ग्रॅम वजनाचा ४२ इंच लांब व साडेपाच इंच जाड असे दोन साप पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर साप लाडखेड जि. यवतमाळ येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले. यानंतर पोलिसांनी या दोघांनाही कारंजा वनविभागाच्या हवाली केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाºयांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता. त्या दोन्ही आरोपींना चौकशीसाठी शनिवारपर्यंत वनविभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात सापांची तस्करी करणाºया टोळीचा पदार्फाश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Web Title: snake smuggler in custody of forest police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.